मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असल्यामुळे कॉलेजेस पुन्हा सुरू होतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या तरी कॉलेजेस सुरू होणार नाहीत. ऑनलाईन शिक्षणच सुरू राहिल. कोरोना स्थितीचा आढावा आणि संभाव्य तिसरी लाट हे लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तिसरी लाट आली तर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि व्यवस्थापन या सर्वांनाच मोठा त्रास होऊ शकतो. आगामी महिनाभर तरी कॉलेजेस सुरू होणार नाहीत, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.