नवी दिल्ली – काही वर्ष टिव्ही मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर राजकारणात प्रवेश करत केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झालेल्या स्मृती इराणी यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या पहिल्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाचे प्रकाशन वेस्टलॅंड नावाच्या प्रकाशन कंपनीनं केले असून हे पुस्तक 29 नोव्हेंबर रोजी प्रकाशित आहे. ही आनंदाची बातमी असतानाच आणखी एक खास आनंदाची बातमी म्हणजे केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी 25 डिसेंबर रोजी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांची मुलगी शानेलच्या एंगेजमेंटची घोषणा केली.
स्मृती इराणी यांनी मुलगी आणि तिच्या भावी जावयाचे फोटोही शेअर केले आहेत. स्मृती इराणी यांच्या जावयाचे नाव अर्जुन भल्ला आहे. त्यामुळे आता या पोस्टवर अभिनंदनाचा ओघ आला आहे. स्मृती इराणी या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. वेग-वेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. त्या त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात.
स्मृती यांना दोन मुले आहे. त्यांच्या दोन मुलाचे नाव जोर इराणी, तर मुलीचे नाव जोइश इराणी असे आहे. दुसरीकडे त्यांच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलीचे नाव शैनेल असे आहे. शैनेल आता जीवनाच्या नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. मुलीच्या नव्या प्रवासाची एक झलक स्मृती यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. शैनेलचा साखरपुडा झाला आहे. या खास क्षणाचे काही फोटो स्मृती यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.
हा फोटो शेअर करत त्यांनी होणाऱ्या जावयाला मजेशीर अंदाजात धमकी देत त्याचं कुटुंबामध्ये स्वागत केले आहे. फोटोमध्ये शैनेलचा बॉयफ्रेंड होणाऱ्या पत्नीला गुडघ्यांवर बसून अंगठी घालताना दिसत आहे. सध्या हा खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
स्मृती इराणी कॅप्शनमध्ये म्हणाल्या, ‘ही खास पोस्ट त्या खास व्यक्तीसाठी ज्याने आमचे मन जिंकले आहे. आमच्या कुटुंबात तुमचे स्वागत असून सासऱ्यांसोबत तुमची भेट मजेदार असणार आहे आणि माझ्याकडून ऑफिशियल वॉर्निंग…’ असे म्हणत स्मृती इराणी यांनी नव्या जोडप्याला शुभ आशीर्वाद दिले आहेत. पुढे स्मृती यांनी लिहिले की, ‘अर्जुन भल्ला आमच्या वेड्या कुटुंबात स्वागत आहे. मी तुला आशीर्वाद देतो कारण आता तुला एका वेड्या माणसाशी सासरे म्हणून सामोरे जावे लागेल आणि त्याहून वाईट. मला सासू म्हणून सामोरे जावे लागेल. मी तुम्हाला अधिकृतपणे इशारा देत आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देईल…’