सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर MH11 आणि MH50 या दोन्ही क्रमांकाच्या वाहनांना राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे टोल मुक्ती दिल्याची पोस्ट फिरत आहे. तथापि, अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच सदर पोस्ट चुकीची व खोटी असून कोणीतरी खोडसाळपणे टाकली आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असेही खुलाश्यात म्हटले आहे.
Minister Shambhuraje Desai Viral Post