गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मंत्री सत्येंद्र जैन यांची जेलमध्ये व्हीआयपी देखभाल; तडकाफडकी अधिक्षकाचे निलंबन

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2022 | 6:13 pm
in राष्ट्रीय
0
satyendra jain e1654581758394

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. तुरुंग अधीक्षक अजित कुमार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली सरकारच्या तुरुंग विभागाने म्हटले आहे की, प्रथमदर्शनी असे आढळून आले आहे की अजित कुमार यांनी कर्तव्य बजावण्यात निष्काळजीपणा केला होता. याप्रकरणी पुढील तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

अजित कुमार हा जेल क्रमांक ७ चा प्रभारी असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्येंद्र जैन यांना जेल क्रमांक ७ मध्येच ठेवण्यात आले आहे. अमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आम आदमी पार्टी सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती न्यायालयाला दिली होती, ज्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. न्यायालयात आपली भूमिका मांडताना ईडीने म्हटले होते की, सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात अज्ञात व्यक्तीने पायाची मालिश करताना पाहिले होते.

पुरावा म्हणून यासंबंधीचे व्हिडिओही आपल्याकडे असल्याचा दावाही ईडीने केला होता. याशिवाय त्यांना विशेष जेवणही देण्यात आल्याची माहिती ईडीकडून न्यायालयाला देण्यात आली. कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन हे १२ जूनपासून दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. तपास यंत्रणांच्या हवाल्याने असेही सांगण्यात आले की, सत्येंद्र जैन आपल्या पत्नीला तुरुंगात अगदी सहज भेटतात. तो तुरुंगाचे नियम झुगारून पत्नीला भेटतो. ईडीनेही सत्येंद्र जैन यांच्याबाबत न्यायालयासमोर सांगितले होते की, ते तपासात सहकार्य करत नाहीत.

मनी लाँड्रिंगच्या गंभीर आरोपांनी घेरलेल्या सत्येंद्र जैन यांच्या अडचणी संपत नाहीत. महाठग सुकेश चंद्रशेखर याने अलीकडेच सत्येंद्र जैन आणि आम आदमी पार्टीच्या काही नेत्यांवर एकामागून एक पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. सुकेश चंद्रशेखर याने दावा केला होता की, सत्येंद्र जैन यांनी तिहारमध्ये त्याच्याकडून संरक्षण म्हणून १० कोटी रुपये घेतले. एवढेच नाही तर अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी आपल्याला राज्यसभेचे तिकीट देण्यास सांगितले होते आणि त्याबदल्यात त्याच्याकडून ५० कोटी रुपयेही घेतले होते, असा दावाही या सुकेशने केला होता.

या संपूर्ण वादात भारतीय जनता पक्ष (भाजप) सातत्याने आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत आहे. न्यायालयात ईडीच्या युक्तिवादावर आपची खिल्ली उडवत भाजपने म्हटले होते की, तिहारमध्ये केजरीवाल यांनी मसाज सेंटर उघडले आहे. भाजपने तसे पोस्टरही लावले होते.

डीजींची बदली
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना लिहिलेल्या पत्रात ठग याने आपच्या नेत्यांविरोधात बोलल्यानंतर तुरुंगात त्याला आणि त्याच्या पत्नीला छळण्यात आले. सीआरपीएफ जवानाने आपल्याला मारहाण केल्याचा दावा सुकेशने केला होता. सुकेशने त्याला आणि त्याच्या पत्नीला दिल्ली सोडून इतर कारागृहात हलवण्याची विनंती केली होती. सुकेश याने तिहारचे तुरुंग महानिरीक्षक (डीजी) संदीप गोयल यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर डीजी संदीप गोयल यांची बदली करण्यात आली.

Minister Satyendra Jain Tihar Jail VIP Treatment
Superintendent Suspend Delhi AAP BJP

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसकडे नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण; यांची आहे प्रमुख भूमिका (व्हिडिओ)

Next Post
Balbharati Trailer Launch 1 e1668434364635

‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण; यांची आहे प्रमुख भूमिका (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011