शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नितीन गडकरींकडे आहे हा अनोखा ट्रॅक्टर… वर्षाकाठी होते इतक्या लाखांची बचत… त्यांनी स्वतःच सांगितलं…

मार्च 18, 2023 | 4:57 pm
in संमिश्र वार्ता
0
FrfHwmTWYAAyy5C

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काश्मीर ते कन्याकुमारी जोडणारे नाशिक हे मध्यवर्ती स्थान आहे. त्यासाठी आता मुंबई किंवा पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी भाजा, फळे, औषध साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज बनवले पाहिजे. जेणेकरुन माल खराब होण्याचे प्रमाण कमी होऊन वाहतूक करणे सोपे होईल. ज्यामुळे वाहतूकीचा खर्च कमी होईल व इंधनाची बचत होईल. देशातील मध्यवर्ती स्थान पाहता भविष्यात नाशिक देशाची लॉजेस्टिक कॅपिटल व्हावी व त्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात मे महिन्यात ऑटो अँड लॉजीस्टिक एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने शनिवारी ( दि.१८) महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात ‘ऑटो अँड लॉजीस्टिक समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले, हिमाचल प्रदेशमध्ये अटल टनल बनवल्याने साडेतीन तासाचा रस्त्याचे अंतर साडेआठ मिनिटावर आले. तसेच लेह लडाख मार्गामुळे अंतर वाचणार असून इंधनाची मोठी बचत होणार आहे. इंधन म्हणून डिजेलचा पर्याय सर्वात महागडा व प्रदूषणकारी आहे. त्याऐवजी एलपीजी, सीएनजीचा स्वस्त व प्रदूषण विहरीत पर्याय उपलब्ध आहे. टाटा, अशोक ली लॅण्ड या कंपन्यांकडून इलेक्ट्रिक ट्रक निर्माण केले जात आहे. भविष्यात हायड्रोजनवर चालणारे ट्रक बनवले जाणार आहे.त सेच इंधन म्हणून बायो डिझेल, मिथेनॉल हे पर्याय देखील उपलब्ध आहेत. जैविक इंधन तयार करण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी संधी आहे. मी स्वत:च्या ट्रक्टरसाठी जैविक इंधन वापरुन वर्षाला एक लाखाची बचत केल्याचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. भविष्यात लॉजेस्टिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडणार आहे. त्यासाठी ट्रान्सपोर्ट इंड्रस्टीने तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांच्या हस्ते एक्स्पोच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी ‘सारथी सुविधा केंद्र’ या मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारी अध्यक्ष पी.एम.सैनी, सचिव शंकर धनावडे, सेवा अॅटो मोबाईलचे मॅनेजिंग डायरेक्टर संजीव बाफना, जितेंद्र ऑटोमाबाईल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर जितेंद्र शाह, आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, ए.आय.एम.टी.सी चे अध्यक्ष अमृतलालमदन,दिल्ली अध्यक्ष मलकतसिंग बल, महाराष्ट्र महासंघ अध्यक्ष प्रकाश गवळी, बी.जी.टि.अे सचिव सुरेश खोसला आदीसंह सल्लागार समिती, पदाधिकारी व संघटनेचे सभासद उपस्थित होते.सूत्रसंचालन परी ठोसकर यांनी केले.

शहराबाहेर ट्रान्सपोर्ट नगर उभारावे
नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण बघता शहरात होणारी वाहनांची गर्दी व प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने शहराबाहेर ट्रान्सपोर्ट नगर उभारावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. द्वारका चौकातील वाहतून कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी पूल बांधला. आता आपण डबल डेकर पूल बांधत आहोत असे त्यांनी सांगितले.

बक्षिस वितरण सोहळा
एक्स्पो उपक्रमांअंतर्गत मविप्र केबीटी अभियांत्रिकीब महाविद्यालयात ‘नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यटन विकासाचा सर्वांगीण दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व पोस्टर सादर केले होते. त्यातील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

वाहतूक समस्यांवर उपाययोजना पॉवर पॉइंट स्पर्धा
प्रथम – अथर्व कातकडे दीपक पाटील,खुशाल जाधव, मनीषा पाटील विद्यार्थी ग्रुप
द्वितीय – श्याम हंडोरे जानवी पवार ऋचा वाल्हे विद्यार्थी ग्रुप
तृतीय – ऋषिकेश फाल्ले, जयेश काडव, अभिजीत चव्हाणके, सनी भिमानी विद्यार्थी ग्रुप
चतुर्थ – सावनी थेटे, अंशुला निरगुडे, तृप्ती बस्ते, ईशा नवरकर, सायली रुईकर

सौंदर्य व विकास पर्यटन उपाययोजना पॉवर पॉइंट स्पर्धा
प्रथम – मानसी वाघ, पायल परदेशी, देवेश मोर्य, सुजित निकम, निकिता पाटील, आकाश रुले, ओम मुंडनकर विद्यार्थी ग्रुप
द्वितीय – देवयानी निकम, प्रणिता लोखंडे, शुभांगी सिंग, तेजस्विनी शिंदे, खुशबू नांदरे विद्यार्थी ग्रुप
तृतीय – प्रगती देसले, कांचन खैरे, निकिता हालदेर, श्लोका कोठावदे विद्यार्थी ग्रुप
चतुर्थ – शुभांगी सिंग, तेजस्विनी शिंदे, देवयानी निकम, प्रणिता लोखंडे, खुशबू नांदरे विद्यार्थी ग्रुप

https://twitter.com/nitin_gadkari/status/1636986645160263680?s=20

Minister Nitin Gadkari Tell About Tractor

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

ईडी आणि सीबीआय विरोधकांवरच का कारवाई करीत आहे? अमित शहा म्हणाले…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Amit Shah e1745028572893

ईडी आणि सीबीआय विरोधकांवरच का कारवाई करीत आहे? अमित शहा म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011