इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या स्थितीत एका लिटरला १०० हून अधिक रुपयांना मिळणारे पेट्रोल लवकरच १५ रुपयांना मिळेल असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. हो पण हे खरे आहे. खुद्द केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतापगडमध्ये सांगितले की, लवकरच पेट्रोल १५ रुपये प्रतिलिटर या दराने मिळेल. मी ऑगस्टमध्ये टोयोटा कंपनीची वाहने लाँच करत आहे. आता सर्व वाहने शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणार आहेत. देशातील शेतकरी केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जा प्रदाताही बनेल.
राजस्थानमधील प्रतापगड येथे एका सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जर सरासरी ४० टक्के वीज आणि ६० टक्के इथेनॉल पकडले तर पेट्रोलची किंमत १५ रुपये प्रति लीटर होईल. याचा फायदा देशातील जनतेला होणार आहे. प्रदूषणात घट होईल, तसेच शेतकरी अन्नदात्यापासून ऊर्जादाता बनेल. गडकरी म्हणाले की, आज विमानाचे इंधनही शेतकरीच बनवत आहेत, हे आमच्या सरकारचे आश्चर्य आहे.
सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, मात्र इतकी वर्षे राज्य करूनही गरिबी हटवता आलेली नाही. होय, यावेळी एक गोष्ट नक्कीच घडली की काँग्रेसने आपल्या लोकांची गरिबी दूर केली.