गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मंत्री नितीन गडकरी नाशिक दौऱ्यावर; कोट्यवधींच्या विकासकामांचे होणार भूमीपूजन, बघा, संपूर्ण यादी

by India Darpan
डिसेंबर 14, 2022 | 3:32 pm
in स्थानिक बातम्या
0
nitin gadkari

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी येत्या १८ डिसेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध विकासकामांचे भूमीपूजन करणार आहेत. गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण तसेच मुंबई -आग्रारोडवरील आडगाव शिवारातील दहावा मैल, जवळके फाटा तसेच नाशिक तालुक्यातील आंबेबहूला येथे बोगदा यांचाही समावेश आहे. ८६० कोटी रुपयांच्या विकासकामांचे हे भूमीपूजन नाशिकसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे नाशिक-मुंबई दरम्यानच्या वाहतुकीची कोंडी टाळणार असून खान्देशातील प्रवाशांना समृद्धी महामार्गाला सहजपणे जॉईन होता येणार आहे. तर, बोगद्यांमुळे अपघात टळण्यास मोठी मदत होणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.

गोंदे फाटा ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्यावर सतत वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. पिंपरी सदो पासून समृद्धी महामार्ग हा अगदीच हाकेच्या अंतर्गत आहे. त्यामुळे नाशिक – मुंबई दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. हेमंत गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते. नासिक – मुंबई महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी आणि धुळे , जळगाव, नंदुरबार येथील प्रवाशांना पिंपरी सदो शिवारातील समृद्धी महामार्गावर लवकरात लवकर पोहोचण्यासाठी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण होणे किती गरजेचे आहे हे खा. गोडसे यांनी ना. नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिले होते.

यातूनच मागील महिन्यात ना. गडकरी यांनी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी सातशे कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे. यापूर्वी खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून महामार्गावरील आडगाव शिवारातील दहावा मैल येथे उड्डाणपुल तर जवळके फाटा आणि आंबे बहूला जंक्शन येथे बोगदयाना मंजुरी मिळालेली आहे. गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या वीस किलोमीटर रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचा समावेश आहे. तसेच, दहावा मैल येथील उड्डाणपुल आणि जवळके फाटा आणि आंबे बहूला जंक्शन येथील भुयारी मार्ग तथा बोगद्यांच्या कामांचा शुभारंभ अठरा डिसेंबर ना. गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. पैकी गोंदे ते पिपरी सदो दरम्यानच्या रस्त्याच्या सहा पदरीकरणासाठी सातशे कोटी तर दहावा मैल चौकातील उड्डाणपूलासाठी सुमारे ४५ कोटी, जवळके फाटा येथील बोगद्यासाठी ५५ तर आंबे बहूल्यासाठी ६० कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे.

Minister Nitin Gadkari Nashik Tour Development Project
Stone Laying Highway Infrastructure

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शहांच्या सासूरवाडीला – खासदार संजय राऊत

Next Post

राज्य सरकारने ‘त्या’ पुस्तकाचा पुरस्कार रद्द का केला? पडद्यामागे काय घडामोडी घडल्या? अजित पवारांनी सगळं सांगितलं…

India Darpan

Next Post
FLJT1cbaUAAwyaE

राज्य सरकारने 'त्या' पुस्तकाचा पुरस्कार रद्द का केला? पडद्यामागे काय घडामोडी घडल्या? अजित पवारांनी सगळं सांगितलं...

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011