नाशिक – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आज येथे 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या 12 प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. मुंबई-नाशिक महामार्गासाठी 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून येणाऱ्या दोन ते अडीच वर्षात नाशिक ते मुंबई हा प्रवास केवळ दोन तासात होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पांमध्ये 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या 12 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा समावेश आहे.
कर्कश हॉर्नमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा विचार करता येत्या काळात सगळ्या गाड्यांचे हॉर्न भारतीय वाद्यातच वाजले पाहिजेत यासंदर्भात नियम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, याबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. नाशिकमध्येही लॉजिस्टिक पार्क बांधायला आपण तयार असून महापालिकेने याकामी पुढाकार घ्यावा असे त्यांनी नमूद केले.
यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रविण पवार तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे, नाशिकचे पालकमंत्री छगन चंद्रकांत भुजबळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
महामार्ग प्रकल्प
कोनशिला समारंभ:
– – राष्ट्रीय महामार्ग 3 वरील चार नंबर श्रेणीची विविध बांधकामे, कल्याण/बापगाव,वशिंद, आसनगाव, आणि कसारा/वशाला जंक्शन. लांबी :3 किमी, खर्च 84 कोटी रु
– राष्ट्रीय महामार्ग 3 वरील वरपे-गोंडे पट्ट्यात घोटी-सिन्नर जंक्शन जवळ उड्डाणपूल. 1.6 किमी, खर्च -44 कोटी
– राष्ट्रीय महामार्ग 3 वर धुळे-पिंपळगाव विभागात पुरमपाडा इथं व्हीयूपी. लांबी- 1.2 किमी, किंमत: 27 कोटी
– राष्ट्रीय महामार्ग 3 वर वडपे-गोंडे विभागात खान्देवली जंक्शन इथे व्हीयूपी. लांबी- 00.70 किमी, किंमत-24 कोटी.
– राष्ट्रीय महामार्ग 753J वरील नांदगाव-मनमाड भागाचे अद्ययावतीकरण. लांबी- 21 किमी, खर्च- 211 कोटी
– राष्ट्रीय महामार्ग 60 वर सिन्नर- नाशिक मार्गावर, 185/500 व्हीयूपी @ Ch. लांबी- 0.8 किमी, किंमत : 25 कोटी
लोकार्पण करण्यात आलेले प्रकल्प:
– के के डब्लू महाविद्यालय ते हॉटेल जत्रा दरम्यान उन्नत मार्गिका आणि पिंपळगाव(बी) येथे चार उड्डाणपूल, कोकणगाव आणि ओझरदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 3. लांबी 8 किमी. खर्च रु. 448 कोटी
– विल्होळी, ओझर येथे व्हीयूपी, गोदावरीवर मुख्य पूल आणि नाशिक शहरात एनएच-3 वर रस्ता सुरक्षा कामे. लांबी 4.5 किमी. खर्चः रु. 57 कोटी.
– एनएच-953 च्या सापुतारा- वणी- पिंपळगाव बसवंत सेक्शनचे अपग्रेडेशन, लांबीः 40 किमी, खर्च रु. 184 कोटी.
– एनएच-160 च्या कुसुंबा मालेगाव सेक्शनचे अपग्रेडेशन. लांबीः 42 किमी. खर्च रु. 203 कोटी.
– एनएच-753J. च्या चाळीसगाव- नांदगाव सेक्शनचे अपग्रेडेशन. लांबीः44किमी. खर्चः रु. 169 कोटी.
– एनएच-848 च्या नाशिक- पेठ ते राज्य सीमा सेक्शनचे रुंदीकरण/ बळकटीकरण. लांबीः 39 किमी. खर्चः रु. 203 कोटी.