बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातमध्ये का जाताय? नितीन गडकरी म्हणाले…

नोव्हेंबर 5, 2022 | 1:53 pm
in राज्य
0
Nitin Gadkari e1699008629242

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेदान्त-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प, तसेच विमान निर्मितीचा टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्दा गेल्या काही दिवस सातत्याने चर्चेत आहे. या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले आहे. प्रकल्प कुठे सुरु करायचे हे राज्य सरकारच्या हातात नसतं. प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना तो कुठे सुरु करायचा याचा अधिकार असतो असे ते म्हणाले.

गडकरी यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या विषयावरुन भाष्य केलं आहे. ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी भाष्य केले. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असूनही एका मागून एक वेगवेगळे प्रकल्प गुजरातमध्ये का जात आहे याविषयी गडकरींना विचारणा करण्यात आली होती. आधी वेदान्त-फॉक्सकॉन नंतर टाटा एअरबसचा प्रकल्पही गुजरातला गेला. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सरकार असूनही गुंतवणूकदार महाराष्ट्र सोडून गुजरातला चालले आहेत, असा थेट प्रश्न गडकरींना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरींनी, “पहिली गोष्ट अशी की भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यातही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही सर्वात वेगाने वाढत आहे. मी नागपूरचा आहे. आमच्याकडे टालची फॅक्ट्री आहे. जे एअरबस आणि बोईंग दोघांचे सुटे भाग बनवतात. तिथे आता राफेल आणि फाल्कनही बनवत आहेत. उद्योगधंदे अनेक ठिकाणी जातात. उद्योग कुठे स्थापन करायचा कुठे नाही हा गुंतवणूकदाराचा अधिकार असतो. हे राज्याच्या हातात नसतं. गुंतवणूकदाराचा अधिकार असतो की उद्योग कुठे सुरु करायचा,” असं गडकरी म्हणाले.

तसेच, “मी सुद्धा मिहानमध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी टाटाला पत्र लिहिलं होतं. त्यांच्या अध्यक्षांचं पत्रही आलं, असा संदर्भ गडकरींनी यावेळी बोलताना दिला. त्यावरुन मुलाखतकाराने निवडणुकीच्या आधी महाराष्ट्राऐवजी गुजरातला उद्योजक जात आहे, असं गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचासंदर्भ देत प्रश्न विचारला. तसेच टाटांकडून गडकरींना उत्तर आल्याचा मुद्द्यावरुन, “तुम्हाला उत्तर आलं पण त्यांनी पैसे तिकडे लावले आणि तुम्हाला आपण बोलू असं सांगितलं,” असं म्हटलं. यावर गडकरींनी उत्तर देताना, “असं नाही. टाटाचा टाल नावाचा मोठा प्रोजेक्ट मी मिहानमध्ये नागपूरला घेऊन गेलो. फाल्कन, राफेचे भाग तिथे बनवतात. हळूहळू क्षमता असेल त्या ठिकाणी उद्योग वाढतात. प्रत्येक जागेच्या काही सकारात्मक आणि नकारात्मक बाबी असतात. कच्चा माल, कर सवलत यासारख्या गोष्टींचाही परिणाम होतो. काही राज्यांमध्ये अधिक करसवल दिली जाते. महाराष्ट्रही गुजरातप्रमाणेच प्रगतीच्या वाटेवर आहे,” असं उत्तर दिलं.

महाराष्ट्रात सर्वत्र विकास
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागांमध्ये सध्या उद्योगधंदे सुरु असल्याचे गडकरी म्हणाले. “महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मूलभूत सेवा निर्माण झाल्या आहेत. वाहनउद्योगातील कंपन्या आहेत. मर्सिडजी इलेक्ट्रीक गाडी मी नुकतीच लॉन्च केली त्याची कंपनी पुण्यात आहे. अनेक मोठ्या वाहननिर्मिती कंपन्या पुण्यात आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात बराच विकास झालेला आहे. आधी विदर्भ, मराठवाडा पिछाडीवर असल्याचा वाद व्हायचा. विदर्भ, मराठवडा आणि कोकणाशी दुजाभाव होत असल्याचा आरोप केला जायचा. पण आता सर्वच भागांमध्ये विकास होताना दिसतोय,” असं गडकरी म्हणाले.

Minister Nitin Gadkari Industrial Projects Going in Gujrat
Politics Maharashtra Development

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ट्विटर वापरकर्त्यांनो सावधान! आता या ३ कारणांसाठी मोजावे लागणार पैसे

Next Post

भारत जोडो यात्रेत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधींवर गुन्हा दाखल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
Rahul Gandhi e1667637323998

भारत जोडो यात्रेत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधींवर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011