नवी दिल्ली – मोदी सरकारमधील अत्यंत प्रामाणिक, कार्यक्षम आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. नेहमीच ते विकासाचे राजकारण करतात, असे सर्वजण म्हणतात. त्यामुळेच स्वपक्षासह अन्य पक्षातही त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या अत्यंत साध्या स्वभावाची वेळोवेळीच चर्चा होत असते. आता निमित्त आहे ते विमानात जाण्यासाठीचे. विमानात जाण्यासाठी मंत्री गडकरी हे सर्वसामान्यांप्रमाणेच रांगेत उभे असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. कुठलाही लवाजमा किंवा बडेजाव न बाळगता गडकरी हे सर्वसामान्यांप्रमाणेच वावरत असल्याचे यातून दिसत आहे. हा व्हिडिओ आणि गडकरींची ही बाब सर्वांनाच भावते आहे. बघा हा त्यांचा व्हिडिओ
https://twitter.com/navneetmishra99/status/1447475212354609155