नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे एक स्वप्न आहे. खरे तर ते त्यांचे स्वतःचे नाही तर सर्वांचे आहे. प्रत्येकाला त्याच्या कुटुंबासाठी एक कार हवी आहे. आणि गडकरींचे स्वप्न जर सत्यात आले तर प्रत्येक कुटुंबाला त्यांची हक्काची कार मिळणार आहे. खुद्द गडकरींनी एका कार्यक्रमात हे स्पष्ट केले आहे.
ग्रीन हायड्रोजनचा वापर वाढल्यास भारतातील प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचे मालकीचे असू शकते. कारण एक वाहन भविष्यातील स्वच्छ इंधन पर्याय म्हणून हायड्रोजनकडे पाहिले जात असून, जगभरात त्यावर आधारित प्रकल्पांसाठी कोटय़वधींच्या गुंतवणुकीच्या योजना बनविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, भारताला ‘ग्रीन हायड्रोजन’चे जागतिक केंद्र म्हणून मानाचे स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन केंद्र सरकारने आखले आहे.
भारतात येत्या तीन-चार महिन्यांत इंधन म्हणून हायड्रोजनचा व्यवहार्य वापर करण्यासाठी ‘ग्रीन हायड्रोजन’साठी निविदा मागविल्या जाणार आहेत. ४,००० मेगावॅट इतक्या निर्मिती क्षमतेपर्यंत इलेक्ट्रोलायझर्स साठी निविदा येण्याची शक्यता आहे, असे ऊर्जा मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याची सुरुवात म्हणून भारतात लवकरच खत निर्मिती आणि रिफायनिंग संयंत्रांसाठी ऊर्जा स्रोत म्हणून ‘ग्रीन हायड्रोजन’ वापरण्याच्या दृष्टीने तयारी केली गेली आहे.
मिशन ग्रीन हायड्रोजन अंतर्गत भारतात १ डॉलरहून कमी दरात १ किलोग्रॅम ग्रीन हायड्रोजन उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला. जर गडकरी यांचे हे स्वप्न सत्यात उतरले तर येत्या काळात भारतात पेट्रोल डिझेलचे भाव वधारले तरी वाहन चालवणे अगदी स्वस्त होऊ शकते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका राष्ट्रीय परिषदेत भारतातातील ऑटोमोबाईल क्षेत्रासाठीचे आपले स्वप्न सांगितले.
गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार,पेट्रोलियम, बायोमास, ऑरगॅनिक कचरा, सांडपाणी यापासून ग्रीन हायड्रोजन बनवले जाते. विमान, रेल्वे तसेच कार मध्ये सुद्धा हे ग्रीन हायड्रोजन वापरले जाऊ शकते. सध्या नितीन गडकरी वापरणारे टोयोटा मिराई ही हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. एकदा इंधनाची टाकी पूर्ण भरल्यास ही हायड्रोजन कार ६५० किमी पर्यंत प्रवास करू शकते.
हायड्रोजन कार हे एक इलेक्ट्रिक वाहन आहे मात्र चार्जिंग न करता हायड्रोजनच्या वापरावर ही कार चालते. हायड्रोजन कारला आवश्यक वीजपुरवठा हा हवेतील ऑक्सिजन व इंधनाच्या टाकीतील हायड्रोजन यांच्या केमिकल रिऍक्शनने प्राप्त होतो. जर जा यातून अतिरिक्त वीज निर्मिती झाली तर कार मध्ये असणारं पॉवर कंट्रोल युनिट या एनर्जीला बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवते.
हायड्रोजन कार प्रमाणेच गडकरी यांनी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या वापरावर सुद्धा भर दिला. १ लिटर पेट्रोल हे १.३ लिटर इथेनॉलच्या बरोबरीचे आहे. इथेनॉलची किंमत सुद्धा ६२ रुपये प्रति लिटर इतकी कमी आहे. कचऱ्यातून नवनिर्मितीच्या संकल्पनेला अधोरेखित करत गडकरी यांनी नागपूर मधील एका प्रकल्पाची माहिती दिली. आम्ही नागपुरात सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या प्लांट उभारला आहे, यातुन वर्षाला ३०० कोटींची कमाई होते. भारतात केवळ ओला व सुका कचरा व्यवस्थापन करण्याच्या क्षेत्रातून सुद्धा ५ लाख कोटीचे व्यवसाय तयार करण्याची क्षमता आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
Minister Nitin Gadkari Dream Common Man Family Car
Hydrogen Fuel