नाशिक – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नाशिकमध्ये १२६३ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ आज केला. यावेळी त्यांनी नाशिकसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्या खालीलप्रमाणे
– नाशिक मेट्रो नाशिकमध्ये साकारेल. पण, त्याखाली चार पदरी उड्डाणपूल असेल
– द्वारका ते नाशिकरोड या मार्गावर डबलडेकर (दुपदरी) उड्डाणपूल असेल
– डबलडेकर उड्डाणपुलासाठी १६०० कोटी रुपयांचा खर्च येईल
– सद्यस्थितीत द्वारका ते नाशिकरोड हा मार्ग प्रचंड वाहतुकीचा आहे. या प्रकल्पामुळे पुणेकडे जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल
– डबल डेकर उड्डाणपुलाचं लवकरच डिझाईन तयार केलं जाईल
– नाशिक शहरात द्वारका परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. हा जटील प्रश्न उड्डाणपुलामुळे सुटेल
– आगामी दोन वर्षात डबलडेकर उड्डाणपूल साकारला जाईल
– नाशिकमार्गे सूरत-सोलापूर महामार्ग विकासाला चालना देईल