मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज पहाटे चार वाजता सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर धडक दिली. भल्या पहाटे ही कारवाई झाल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. या पथकाने आज सकाळी नवाब मलिक यांना ताब्यात घेतले असून हे पथक मलिक यांना घेऊन ईडी कार्यालयात गेले आहे. मलिक यांची कसून चौकशी सुरू आहे. ईडीच्या पथकाच्या गाडीतच मलिक यांना नेण्यात आले. मलिक यांच्याबरोबर त्यांचा मुलगा आणि वकील अमीर मलिक हा सुद्धा ईडी कार्यालयात दाखल झाल्याचे मलिक यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. अखेर तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर अखेर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
नवाब मलिक यांच्यावर जी कारवाई होत आहे, यात काही नवीन नाही. सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातोय, त्याचे हे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी दिली आहे.@PawarSpeaks@nawabmalikncp pic.twitter.com/BZAGtJdyrx
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 23, 2022
नवाब मलिक यांची नक्की कुठल्या प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सुडाच्या राजकारणापोटी ही कारवाई होत असल्याचे मलिक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मलिक यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मलिक यांचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर जमणार असल्याचे बोलले जात आहे. एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. ८ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना आता वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेले जाणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नवाब मलिक यांच्यावरील कारवाई म्हणजे सत्तेच्या दुरुपयोगाचा अजून एक प्रकार आहे. ज्या व्यवस्थेमधील त्रुटी @nawabmalikncp यांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर काढल्या त्या व्यवस्थेनेच कोणतीही सूचना न देता त्यांना ताब्यात घेतले आहे. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचा हा प्रकार आहे. pic.twitter.com/tNg7FTLVBa
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 23, 2022