नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्यावतीने शहरात ३५० एकरवर आयटी पार्क प्रस्तावित करण्यात आला आहे. याचसंदर्भात महापालिकेने शहरात आज आयटी परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेला आयटी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत मंत्री राणे यांनी नाशिकसाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक आयटी पार्कला मंजुरी देण्याची जबाबदारी माझी, त्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्तता करुन सर्वंकष प्रस्ताव मला सादर करा, असे आवाहन राणे यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांना केले. तसेच, राणे यांनी नाशिकसाठी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. ते जाणून घेण्यासाठी बघा त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ
https://twitter.com/MeNarayanRane/status/1498586495598620673?s=20&t=fpeTmyVqIWU_dVxmmydCxg