मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या सुद्धा सक्रीय राजकारणात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून त्या यापूर्वी कार्यरत होत्या. त्यामुळेच पक्षाचे विविध कार्यक्रम, आंदोलने यामध्ये त्या सहभागी होत होत्या. आता त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्याकडे राष्ट्रवादी महिला छाणे विभागाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. यापुढे त्या पती प्रमाणेच सक्रीय राजकारणात दिसणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांनी तसे जाहीर केले आहे. त्यामुळेच महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हे पद रक्त होते. आता चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अतिशय अभ्यासू आहेत. तसेच, त्या विधान परिषदेच्या आमदारही राहिल्या आहेत.
विभागनिहाय महिला अध्यक्ष अशा
नागपूर विभाग – शाहीन हकीम
अमरावती विभाग – वर्षा निकम
औरंगाबाद विभाग – शाझिया शेख
लातूर विभाग – वैशाली मोते
पश्चिम महाराष्ट्र – कविता म्हेत्रे
पुणे विभाग – वैशाली नागवडे
सिंधुदुर्ग विभाग – अर्चना घारे
ठाणे विभाग – ऋता आव्हाड
उत्तर महाराष्ट्र विभाग – अनिता परदेशी
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार श्रीमती विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खा. डॉ. @DrFauziaKhanNCP यांनी आज विद्याताईंना नियुक्ती पत्र दिले. #NCP #महिलाप्रदेशाध्यक्ष #नियुक्ती pic.twitter.com/nzSLvYdWjo
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 5, 2022