मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आमदारांसाठी ३०० घरे उपलब्ध करुन देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून त्यावर टीका सुरू आहे. आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अन्य पक्षांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. अखेर त्याची दखल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी आज मोठा खुलासा केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने नुकतेच आमदारांचे स्वीय सहायक (पीए) आणि त्यांचे वाहनचालक (ड्रायव्हर) यांचा पगार वाढविला आहे. त्यास काही दिवस उलटत नाही तोच आता मुंबईमध्ये आमदारांना स्वतःचे घर देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत आमदारांसाठी ३०० घरे उपलब्ध करुन दिली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. सर्वपक्षीय आमदारांना ही घरे मिळणार असल्याने ती आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले. मात्र, या निर्णयावरुन राज्यभरात गदारोळ होत आहे. विरोधी पक्षांसह अनेक व्यक्तींनी यावर टीका केली आहे. जे आमदार कोट्यधीश आहेत, मोठी संपत्ती त्यांच्याकडे आहे त्यांची काळजी सरकार अधिक करीत असल्याची टीका केली जात आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1507237611806806025?s=20&t=279v71jnkiJH2XvZ-w7wWA
याची दखल मंत्री आव्हाड यांनी घेतली आहे. ते म्हणाले की, आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे ही मोफत देण्यात येणार नाही. या घरांसाठी त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, असे आव्हाड यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1507299858104795136?s=20&t=279v71jnkiJH2XvZ-w7wWA