मुंबई – राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा विवाह गोव्यामध्ये ख्रिश्चन पद्धतीने थाटामाटात पार पडला आहे. तशी माहिती खुद्द आव्हाड यांनीच दिली आहे. आव्हाड यांनी या सोहळ्यातील काही महत्त्वाचे क्षणांचा व्हिडिओही ट्विटरद्वारे शेअर केला आहे.
आव्हाड यांना एकुलती एक कन्या आहे. नताशा असे तिचे नाव आहे. तिने तिचा मित्र अॅलन पटेल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यास आव्हाड यांनी मंजुरी दिली. त्यामुळेच ७ डिसेंबर रोजी अत्यंत साधेपणाने त्यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. कोरोनाच्या संकट काळात अत्यंत साधेपणाने हा विवाह साजरा झाल्याने सर्वत्र कौतुक होत होते. मात्र, आता हाच विवाह ख्रिश्चन पद्धतीने अतिशय थाटामाटात गोव्यामध्ये संपन्न झाला आहे. या विपाहाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आव्हाड यांनी आधी साधेपणाचा दिखावा केला आणि आता जंगी विवाह सोहळा केला, अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1472600881698852871?s=20
गोव्यातील पंचतारांकीत हॉटेल ग्रँड हयात येथे हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील मोठे नेते आणि अन्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. विवाहाच्या पूर्वसंध्येला हॉटेलमध्ये संगीत सोहळ्याचा कार्यक्रमही संपन्न झाला.
आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, नताशा आणि अॅलन हे दोन भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत. ते एकमेकांच्या आवडी-निवडीचा अतिशय आदर करतात. अॅलनचे कुटुंबिय ख्रिश्चन आहेत. त्यामुळे त्यांना ख्रिश्चन पद्धतीने विवाह करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी गोवा हे ठिकाण निवडल्याचं आव्हाड यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1472635126014111745?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1472635126014111745%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fpolitics%2Fjitendra-awhads-daughter-is-now-married-in-a-christian-manner-in-goa-answer-to-critics-from-awhad-598993.html
नताशा आणि अॅलन
नताशा आणि अॅलन हे दोन्हीही जीवलग मित्र आहेत. विशेष म्हणजे, ते लहानपणापासूनच एकत्र शिकले आहेत. नताशाने एमएस (मॅनेजमेंट) असे आहे. तर, अॅलनचे शिक्षण एमएस (फायनान्स मॅनेजमेंट) असे आहे. अॅलन हा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला आहे. सध्या तो स्पेनमध्ये असतो.