मुंबई – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आज अटक करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याला प्रथमच अटक झाली आहे. आव्हाड यांच्या बंगल्यावर अनंत करमुसे या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण केली होती. त्याप्रकरणी करमुसे यांनी तक्रार दिली होती. याचसंदर्भात आज आव्हाड यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
कासारवडवली येथे राहणाऱ्या करमुसे या तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मिडियावर पोस्ट लिहीली होती. कोरोनाव विरोधी लढ्यात पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना घराघरात दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यास आव्हाड यांनी विरोध केला होता. त्यामुळेच करमुसे यांनी आव्हाड यांना पोस्टद्वारे लक्ष्य केले होते. त्यानंतर करमुसे यांनी सांगितले की, माझ्या घरी दोन पोलिस रात्रीच्या सुमारास आले. पोलिस स्टेशनला घेऊन जाण्याचे सांगत त्यांनी आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले. तेथे मला आव्हाड समर्थकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आव्हाड यांनी मला जाब विचारला की मी सोसल मिडियात पोस्ट का लिहीली. यानंतर मी आव्हाड यांची माफी मागितली आणि सोशल मिडीयातील पोस्ट डिलीट केली. त्यानंतरही मला मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर वर्तकनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. माझी अवस्था पोलिसांनी बघितली आणि मला दवाखान्यात नेले. तेथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर स्पष्ट झाले की, मला खुप मारहाण झाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात मारहाण व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, आव्हाड समर्थकांनीही करमुसे याच्या विरोधात तक्रार दिली होती.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1448682216645484544