गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या गावात किती दिवसाने पाणी येते? चर्चा तर होणारच

by India Darpan
जून 9, 2023 | 7:00 pm
in संमिश्र वार्ता
0
Ndr dio News Gulabrao Patil 24 Nov 2022 12 scaled e1733059155240

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.  आधीच प्रचंड उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासियांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. विशेषतः ५५ गावांमध्ये तीव्र टंचाई जाणवत असून नागरिक आता पाण्यासाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे गाव असलेल्या पाळधीत १२ दिवसांनी तर लगतच्या धरणगावमध्ये चक्क २२ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे त्याची राज्यभरात चर्चा होत आहे.

घागरी फोडल्या
गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगावातच पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात सध्या तब्बल ५५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. २३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा होत असून पाणी पुरवठा मंत्री जळगावचे असूनही मण्यारखेडा गावात मनसेने टँकरच्या साहाय्याने पाणी दिले. तर नशिराबाद गावात नागरिकांनी पाण्यासाठी घागरी फोडल्या.

विशेष म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात तब्बल १२ दिवसांनी पाणी येत आहे. तर तिथून अवध्या काही किमीवर असलेल्या धरणगावात तब्बल २२ दिवसांनी पाणी मिळत आहे, एकीकडे गुलाबराव पाटील यांचा उल्लेख त्यांच्या समर्थकांकडून पाणीवाला बाबा असा केला जात असताना. गुलाबराव पाटील हे सुद्धा स्वत:ला पाणीवाला बाबा म्हणतात. तर दुसरीकडे राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघातच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक वणवण भटकंती करत आहेत.

दररोज पाणी देण्याचे आश्वासन
जळगाव जिल्ह्यातील पाडळसरे धरणाचा प्रश्र प्रलंबित आहे. तर दुसरीकडे पाणी पुरवठा मंत्र्यांच्या गावात आणि तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागत नसल्याचे भीषण चित्र समोर आले आहे.विशेष म्हणजे कित्येक वर्षांपासूनचा हा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.

‘हर घर जल’, या केंद्राच्या योजनेचे काम महाराष्ट्रात सुरु आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत गावातून मतदान केले नाही म्हणून आमच्या गावाच्या पाणी योजनेवर लाल फितीत ठेवल्याचा आरोप लोणवाडी गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांनी ५ जुलैपासून दररोज गावाला पाणी देण्याचे आश्वासन आपल्या वाढदिवसाच्या दिवशी दिले आहे. सध्या पाईपलाईनचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाईपलाईनची चाचणी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून पाळधी गावात केली आहे. पाण्यासाठी मनसे आणि नागरिकांनी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हंडा मोर्चा काढला होता.

Minister Gulabrao Patil Village Water Supply

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोयता घेऊन फिरत होता… नाशिक पोलिसांनी असा शिकवला धडा

Next Post

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत एवढ्या वाहनांना प्रवेश नाकारला…. खुद्द आरटीओनेच सांगितले हे कारण

India Darpan

Next Post
Samruddhi

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत एवढ्या वाहनांना प्रवेश नाकारला.... खुद्द आरटीओनेच सांगितले हे कारण

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011