जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त व्यक्त केले आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले की, बायको नांदत नाही तो पण माणूस आमच्याकडे येतो’, त्यांच्या या विधानाने गोंधळ उडाला आहे. महिला तसेच स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या वतीने गुलाबराव पाटील यांची प्रतिमा जाळण्यात येऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या बिनधास्तपणा आणि हटके भाषण शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिवसेना नेत्यांवर चांगलीच टोलेबाजी केली होती. विशेष म्हणजे शेरो-शायरीतून त्यांनी अनेकांना टोला लगावला. तर, गद्दार म्हणणाऱ्यांनाही प्रत्युत्तर दिले होते. इतकेच नव्हे तर नुकतेच त्यांनी ५० खोके म्हणून डिवचणाऱ्यांना सुनावले. रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालाशी केल्यानंतरही पाटील हे चर्चेत आले होते.
तर, जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त विधान केलं. आम्ही जनरल फिजीशियन असून बायको नांदत नाही, असं सांगणाराही माणूस आमच्याकडे येतो, असेही त्यांनी म्हटले, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ हे कधीच हातपाय बघत नाहीत. हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ञ होऊ शकत नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमांमध्ये केलेले आहे.
आता या वक्तव्यावरून शिवसेनेच्यावतीने महापालिकेसमोर मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिमा जाळण्यात आली. तसेच प्रचंड घोषणाबाजी करत गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिला तसेच स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांचा अपमान केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांची तसेच डॉक्टरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
तसेच यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे, स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्रीगुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात केले आहे. तसेच, डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र, आमचे डोकं असं असते की आमच्यासमोर बसलेल्यांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. पण, आम्ही ऐकणारे एकटे असतो. आम्ही जनरल फिजिशियन आहोत. बायको नांदत नाही तो पण माणूस आमच्याकडे येतो, असेही वादग्रस्त विधान गुलाबराव पाटील यांनी केलं. खरे म्हणजे आधीच शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे मंत्री पाटील यांच्या बद्दल उलटसुलट चर्चा केली जात आहे. त्यातच, वादग्रस्त विधान केल्याने त्यांनी विरोधकांच्या हाती आणखी एक मुद्दा हाती मिळाला आहे.
दरम्यान, विरोधकांकडून आणि सोशल मीडियातून होत असलेल्या ५० खोके, एकदम ओके, या टिकेचाही पाटील यांनी समाचार घेतला होता. टिकाकारांना एकप्रकारे त्यांनी चलेंजच केलं आहे. तर ९ व्या दिवशी मंत्रीपद सोडेन मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र, आम्ही मंत्री झालो. नागरिकांना वाटतं आमच्या पुढार्यांची मजा आहे. आणि त्यातच आता ५० खोके सर्व ओके, अशा नव-नवीन घोषणा निघाल्या. पण, ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ, असं थेट आव्हान मंत्री पाटील यांनी केले आहे.
https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19
Minister Gulabrao Patil Controversial Statement Jalgaon