औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यावरून रविवारी शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला व आपली कैफियत मांडली.शिक्षक भारती संघटनेने हा प्रश्न आता थेट ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या दरबारात मांडला आहे.
आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष नवनाथ गेंड,प्रकाश दाणे,भरत शेलार,सुभाष मेहेर,महेंद्र बारवाल,राजेश भुसारी,प्रशांत नरवडे यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेऊन मुख्यालयाची अट रद्द करावी अशी मागणी केली. त्यावर मंत्रीमहोदयांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे, गुणवत्ता विकासाकडे लक्ष द्यावे बाकी प्रश्न आम्ही सोडवतो असे ठोस आश्वासन दिले.
सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता,जुनी पेन्शन, वस्तीशाळा शिक्षकांना मूळ नियुक्ती दिनांकाचा लाभ,पदवीधर शिक्षकांना सरसकट ४३०० रुपये ग्रेड पे, सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगत योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे राज्य प्रसिध्दी प्रमुख सुनील चिपाटे यांनी सांगितले. दरम्यान आजच सकाळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.पुढील आठवड्यात शिक्षकांच्या प्रश्नावर व्यापक बैठक बोलावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
Minister Girish Mahajan Assurance to Teachers Association