मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांच्यासोबत १० ते १३ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात किती आमदार त्यांच्यासोबत आहेत याबाबत स्पष्टता झालेली नाही. शिवसेनेने सर्व आमदारांची आज तातडीने बैठक बोलविली आहे. तसे र्मान शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, शिंदेंसोबत कोण कोण आहे याची उत्सुकता ताणली गेली आहे.
सध्या हे आमदार नॉटरिचेबल आणि शिंदेंसोबत असल्याची जोरदार चर्चा
राज्यमंत्री अब्दुल सत्तार (सिल्लोड)
राज्यमंत्री संदिपान भुमरे (पैठण)
संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम)
उदयसिंग राजपूत (कन्नड)
प्रा. रमेश बोरनारे (वैजापूर)
प्रकाश आबिटकर (भुदरगड)
भरत गोगावले (महाड)
महेश शिंदे (सातारा)
शहाजी पाटील (सांगोला)
ज्ञानराज चौगुले (उमरगा)
तानाजी सावंत (पंराडा)
संजय रायमूलकर (बुलडाणा)
संजय गायकवाड (मेहकर)
नितीन देशमुख (बाळापूर)