मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सध्या पक्ष नेतृत्वावर नाराज असून त्यांनी मध्यरात्रीच काही आमदारांसह अज्ञातस्थळ गाठले आहे. शिंदे हे शिवसेनेत बंड करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आज दुपारी त्यांची पत्रकार परिषद आहे. त्यातून खुलासा होणार असला तरी तत्पूर्वी त्यांच्या नाराजीबद्दल सध्या सर्वत्र बोलले जात आहे. शिंदे हे अचानक नाराज झाले की गेल्या काही काळापासून ते नाराज आहेत, त्यांच्या नाराजीचे कारण काय, शिवसेना नेतृत्वाला त्यांच्या नाराजीची माहिती होती का, असे सारे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
म्हणून आहेत नाराज
– नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने शिंदे यांना फारसे महत्व दिले नाही. व्यूहरचनेसाठी त्यांना विश्वासात घेतले नाही.
– राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाने अन्य नेत्यांना जबाबदारी दिली
– पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात गेल्या काही महिन्यात निर्माण झालेला कमालीचा दूरावा. यातूनच अनेक गैरसमज
– शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे यांचे वाढते महत्त्व
– आदित्य यांच्याबरोबरच त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांच्याकडे सातत्याने दिली जात असलेली जबाबदारी
– संजय राऊत यांचे पक्षात वाढते प्रस्थ
– कट्टर आणि निष्ठावान सैनिक असूनही पक्षात फारशी किंमत न देणे
– नगरविकास मंत्री म्हणून काम करण्यात अनेक अडचणी. निर्णय घेण्यावर बंधने
– नगरविकास विभागाचे निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेणे
– कॅबिनेट मंत्री असूनही मनमोकळेपणाने काम करण्यात अडचणी
minister eknath shinde shivsena politics party dissatisfaction reasons