मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पक्षांतर्गत नाराजीमुळे आमदारांसह सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे यांनी प्रथमच प्रतिक्रीया दिली आहे. शिंदे हे समर्थक आमदारांसह रात्रीपासून गायब आहेत. ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नॉट रिचेबल असलेल्या शिंदे यांनी अखेर त्यांची पहिली प्रतिक्रीया दिली आहे. शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.
दरम्यान, त्यांच्या या प्रतिक्रीयेचे विविध अर्थ काढले जात आहेत. काहींचे म्हणणे आहे की, बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वापासून शिवसेना भरकटली आहे तर काहींचे म्हणणे आहे की शिंदे यांना उद्धव यांचे नेतृत्व आता मान्य नाहीय. आता यापुढे नेमके काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
minister eknath shinde first reaction on political crisis