मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांना आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
चार दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयाने आज त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
सामाजिक न्याय मंत्री @dhananjay_munde साहेबांना आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज झाला असून त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स, स्टाफ, विचारपूस करून आधार दिलेल्या सर्व नेते मंडळी तसेच हितचिंतक व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. (1/2) pic.twitter.com/1OH0y5yxlu
— OfficeofDM (@OfficeofDM) April 16, 2022
रुग्णालयातून बाहेर पडताना श्री मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असून माझ्या प्रकृती साठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईल असे ते म्हणाले.
दरम्यान, डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे कार्यकर्त्यांनी काही दिवस भेटीसाठी येऊ नये मी स्वतः लवकरात लवकर स्वतः कार्यकर्त्यांना येऊन भेटेल असे आवाहनही त्यांनी केले.