नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गिरणा साखर कारखान्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर आता मंत्री दादा भुसे यांनी पहिल्यांदाच परखड प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, खासदार संजय राऊत यांच्या टीव टीववर बोलण्यात अर्थ नाही. ते मालेगावला आले तेव्हा याबाबत का बोलले नाही, जर १७८ कोटींचा घोटाळा आहे, यासाठी सभेच्या १५ दिवस आधी वल्गना केली, मग सभेत का नाही बोलले, असा आरोपही भुसे यांनी केला.
भुसे पुढे म्हणाले की, आम्ही आता गिरणा मौसम या संस्थेच्या शेअर धारक सभासदांची बैठक बोलावणार आहोत. या बैठकीला टीव टीव करणाऱ्यांनाही बोलावणार आहे. घोटाळा झाल्याचे म्हणताय मग या प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत चौकशी करा, काही आढळल्यास मंत्री पद आणि आमदारकीही सोडायला तयार आहे. एवढेच नाही तर राजकारणातून संन्यासही घेईन, अशी घोषणा भुसे यांनी केली.
भुसे पुढे म्हणाले की, पुष्पाताई मंत्री असताना, रेणुका सूत गिरणा नावाने शेअर गोळा करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर रक्कम वळती केली. मात्र अद्यापही मालेगावातील लोकांना ती गिरणी कुठंय माहीत नाही, रक्कम किती जमा झालीय ते माहीत नाही. रेणुका यंत्रमाग संस्था नावाच्या संस्थेने पैसे बँकेकडून घेतले. तीन वेळा अडीच कोटी, असे एकूण साडेसात कोटी रुपये जमा झाले. नाशिक बँकेतूनही कर्ज घेण्यात आले. ते पैसे व्यंकटेश बँकेत वर्ग केले. व दुसऱ्या कामासाठी वापरले. सूतगिरणी प्रकल्प सुरू झाला नाही. बँकेला पैसे परत दिले नाही. बँकेने प्रकल्पातील वस्तूंचा लिलाव केला. त्यातून १ कोटी मिळाले. शेअर मधून वसुली होणार असून त्यातून २ कोटी जमा होतील, हा गुन्हा आहे. जशी गिरणा साखर कारखान्याची चौकशी करा, मात्र रेणुका घोटाळ्याचीही पण चौकशी करा, असे भुसे म्हणाले. ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावरही भुसे म्हणाले की, अद्वय हिरे हे उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांनी 2-4 बँकांकडून कर्ज घेतलंय, व नंतर त्या बँक बंद पडल्या.
Minister Dada Bhuse on Girna Sugar Factory Scam