मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत यांनी खनिकर्म आणि बंदर विकास मंत्री दादा भुसे यांच्यावर हल्ला चढविला आहे. राऊत यांनी गिरणा अॅग्रोमधील शेअर्स घोटाळा काढून भुसे यांना लक्ष्य केले आहे. या नव्या प्रकरणाने शिंदे सरकारचे टेन्शन वाढले आहे.
गिरणा अॅग्रोमधील शेअर्स घोटाळ्याबाबत राऊत यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी भुसे यांचा फोटोसह गंभीर आरोप लावले आहेत. ‘हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले गेले. पण, कंपनीच्या वेबसाइटवर मात्र फक्त १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स आहेत. तेही फक्त ४८ सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल,’ असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.
संजय राऊतांनी मंगळवारी सकाळी केलेल्या एका सूचक ट्वीटमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या ट्विटमध्ये संजय राऊतांनी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांचे नाव घेतले असून भुसे यांनी गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधींचे शेअर्स गोळा केल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
कायदा सुव्यवस्था कोठ्यावर नाचतेय
काही दिवसांपूर्वी राऊत यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृत युवतीचा फोटो ट्वीट केला होता. ती युवती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील असून तिच्यावर अत्याचार झाल्याचे राऊत ट्वीटमध्ये म्हणाले होते. त्या ट्वीटमध्ये राऊतांनी भाजपलाही लक्ष्य केले होते. त्या प्रकरणावरून राऊत यांच्यावर बरीच टीका झाली. पण, राऊत यांनी त्यात माझे काहीही चुकले नसल्याचे सांगितले आहे. तसेच,‘माझ्यावर गुन्हा दाखल होतो ही या राज्याची कायदा सुव्यवस्था कोठ्यावर कशी नाचतेय हे दिसतेय, अशीदेखील टीका केली.
https://twitter.com/rautsanjay61/status/1637848703737430016?s=20
Minister Dada Bhuse Fraud MP Sanjay Raut Girna Agro