इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तेलंगणचे श्रममंत्री एम मल्ला रेड्डी यांच्या ताफ्यावर रविवारी घाटकेसर येथे एक गटाने हल्ला केला. रेड्डी जागृती या सामाजिक मंचातर्फे आयोजित केलेल्या बैठकीतून परतताना रेड्डी यांच्या ताफ्यावर बूट, दगड आणि खुर्च्यांद्वारे हल्ला करण्यात आला.
या कार्यक्रमात मल्ला रेड्डी हे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे कौतुक करत होते. त्यानंतर गर्दीतील काही नागरिकांनी त्यांच्याविरुद्ध मल्ला रेड्डी डाउन डाउन अशी घोषणाबाजी केली. मंत्र्यांचे भाषण संपताच काही जणांनी त्यांच्या ताफ्यावर खुर्च्या फेकल्या. नंतर पोलिसांनी गर्दी नियंत्रित करत मंत्री रेड्डी यांना गर्दीतून बाहेर काढले.
घाटकेसर येथील पोलिस निरीक्षक एन. चंद्र बाबू यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी आम्हाला कोणाकडूनही तक्रार मिळाली नाही. जर कोणी तक्रार दाखल करणार असेल तर आम्ही तक्रार नोंदवून घेऊ. अद्याप कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, समाजाच्या मागणीनुसार, रेड्डी महामंडळ लवकरात लवकर स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आवाहन करणार असल्याची घोषणा मल्ला रेड्डी यांनी या वेळी केली आहे.
https://twitter.com/Spoof_Junkey/status/1531141199800590336?s=20&t=9PQSipW9xBk6sfO6MLaqNA