नागपूर – राज्याचे ग्राहक संरक्षण व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून शिवभोजन थाळीकडे बघितले जाते. या थाळीची योजना भुजबळ यांच्याच मंत्रालयाअंतर्गत राबविली जाते. कोरोना काळात शिवभोजन थाळीचा मोठा फायदा गरजूंना झाला. आता विदर्भ दौऱ्यात खुद्द भुजबळ यांनीच शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. ज्या खात्याची योजना आहे त्या खात्याचा मंत्रीच शिवभोजन केंद्रात येत असल्याने केंद्राच्या संचालकांसह सर्वांचीच भंबेरी उडाली. भुजबळ यांनी अचानक शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्याचा निर्णय घेतला. भिवापूर येथील केंद्राला त्यांनी भेट दिली. थाळीचा दर्जा असाच उत्तम ठेवावा, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजू पारवे हे होते. बघा हा व्हिडिओ
विदर्भ दौऱ्यावर असताना भिवापूर येथील शिवभोजन केंद्राला भेट देऊन स्वादिष्ट शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. यावेळी शिवभोजन केंद्र चालकांना जेवणाचा दर्जा अशाच प्रकारे उत्तम ठेवण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांशी देखील संवाद साधला..यावेळी स्थानिक आमदार राजू पारवे सोबत होते.#शिवभोजन pic.twitter.com/CR109KeWQh
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) October 18, 2021