पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत. पाटील हे एका कार्यक्रमात म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. पण, त्यांना कुठलेही सरकार अनुदान मिळाले नाही. त्यांनी नागरिकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या. पाटील यांच्या या वक्तव्याने महापुरुषांचा अपमान होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या वक्तव्यासंदर्भात पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बघा, ते काय म्हणाले…
मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद https://t.co/zb0ClhTHxQ
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) December 9, 2022
Minister Chandrakant Patil on Dr Ambedkar Phule School