नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नाशिकचे दोन्ही लोकप्रतिनिधी एकाचवेळी कोरोना बाधित झाले आहेत. डॉ. पवार आणि गोडसे हे दोघेही नाशकात एकाच कार्यक्रमाला दोन दिवसांपूर्वी उपस्थित होते. तर, या दोन्ही मान्यवरांनी गेल्या काही दिवसात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.
खासदार गोडसे हे दुसऱ्यांदा कोरोना बाधित झाले आहेत. गेल्या वर्षीही त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी ते खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. आता ते पुन्हा बाधित झाले आहेत. तशी माहिती गोडसे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन गोडसे यांनी केले आहे.
https://twitter.com/mphemantgodse/status/1478791631281086465?s=20
तर, दिंडोरी लोकसभेच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसात त्यांचे नाशिक, मुंबई येथे कार्यक्रम होते. तेथे त्यांनी हजेरी लावली. नाशिकहून मुंबई जात असताना त्यांना काही प्रमाणात लक्षणे जाणवली. त्यानंतर त्यांनी चाचणी केली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्या तातडीने विलगीकरणात आहेत. डॉ. पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. तर, नाशिकमध्ये केंद्रीय हॉस्पिटलचे उदघाटन व तरुणांच्या लसीकरणाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते झाला होता.