नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे… गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को… ५० खोके एकदम ओके… सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके… वसुली सरकार हाय हाय… श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या… अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली. अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. शिवाय माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
https://twitter.com/NCPspeaks/status/1607290581369192448?s=20&t=a2_tj_YS14abcxHKcWsoOw
Minister Abdil Sattar Resignation Demand
Maharashtra Winter Assembly Session Nagpur Opposition