इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक पर्यटकांना उत्तर भारतातील पर्यटन स्थळे आकर्षित करतात. त्यातच जर आपण लखनौ ते अमृतसर, डलहौसी आणि धर्मशाळा असा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे, कारण IRCTC एक उत्तम पॅकेज घेऊन आले आहे.
या पॅकेजद्वारे पर्यटक अमृतसर, डलहौसी आणि धर्मशाळेला जाऊ शकता. या टूर पॅकेजमध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि डलहौसीमधील भव्य हिल स्टेशन्स आणि धर्मशाळा यांचा आनंद घेऊ शकता. सदर टूर पॅकेज हे 6 रात्री आणि 7 दिवसांच्या कालावधीसाठी आयोजित केले आहे. पहिल्या दिवसाचा प्रवास अमृतसरपासून सुरू होतो.
अमृतसरमध्ये, हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम दिला जाईल, जिथे त्याच दिवशी वाघा बॉर्डरवर भारत-पाक सीमा परेड सोहळा पाहण्यास सक्षम असाल. IRCTC या टूर पॅकेजमध्ये, ये-जा करण्यासाठी फ्लाइट तिकीट मिळेल. त्याठिकाणी फिरण्यासाठी बसेस आणि राहण्यासाठी हॉटेल आणि जेवण दिले जाईल. याशिवाय या टूर पॅकेजमध्ये मार्गदर्शक आणि विमा मिळतो.
दुसऱ्या दिवशी तुम्ही अमृतसरहून डलहौसीला पोहोचाल. दुसऱ्या दिवशी, डलहौसीहून चंबाला पोहोचाल, जिथे खज्जियारला भेट देण्याची संधी मिळेल, ज्याला भारताचे मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. यानंतर तुमचा प्रवास डलहौसी ते धर्मशाला असा होईल. धर्मशाळेत रात्रीचा मुक्काम करायला मिळेल. पाचव्या दिवशी कांगडा मार्गे धर्मशाळेतून चामुंडा-ज्वाला जीला पोहोचाल. त्याच वेळी, 6 व्या दिवशी धर्मशाळेतून परत अमृतसरला पोहोचाल. यानंतर, तुम्ही 7 व्या दिवशी अमृतसर हॉटेलमधून फ्लाइटने लखनऊला पोहोचाल.
मिळतील या सुविधा
या टूर पॅकेजमध्ये लखनऊ ते अमृतसर आणि अमृतसर ते लखनऊ फ्लाइट तिकीट मिळेल. त्याचबरोबर अमृतसरमध्ये 2 रात्री घालवण्याची संधी मिळेल. याशिवाय तुम्ही धर्मशाळेत 2 दिवस राहाल. डलहौसीमध्ये 2 दिवसांचा मुक्काम देखील मिळेल. या 6 दिवसात नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. साईड-सीन प्रवासासाठी शेअरिंग आधारावर 16 सीटर एसी वाहन मिळेल. याशिवाय ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि टूर मॅनेजर देखील मिळेल.
किंमत व बुकींग
टूर पॅकेजची किंमत 34 हजार रुपयांपासून सुरू होते, जी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट https://www.irctctourism.com वरून देखील बुक करू शकता.
mini Switzerland tourism irctc package travelling