इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तेलंगाणातील एमआयएम पक्षाचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यात खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवले. या घटनेवरुन राज्यात मोठे वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कारण, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे या सर्वांनी ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यामुळे नजिकच्या काळात या घटनेवरुन आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षात काय घडले
एमआयएमचे औरंगाबाद येथील खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतलं. ओवेसी यांनी खुल्ताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवर डोके ठेऊन नमस्कार केला. त्यामुळे ही बाब आता अनेकांना खटकली आहे.
कोण काय म्हणाले
याप्रकरणी भाजप आणदार नितेश राणे अतिशय आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी थेट आव्हान दिले आहे की, पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा. याला (ओवेसी) औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही. राणे यांच्या या प्रतिक्रीयेनंतर आता आणखीनच वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
https://twitter.com/NiteshNRane/status/1524963515697532928?s=20&t=dGd4up1BP1M5y3jgrI_Qtw
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणे हा कदापिही रितीरिवाज असू शकत नाही, वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न ओवेसींकडून होतोय. औरंगजेबाने आमची अनेक मंदिरे उध्वस्त केली. औरंगजेबाला अखेर महाराष्ट्राच्याच मातीत गाडलं होतं त्यामुळे, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे लक्षात ठेवा., असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, हैदराबादचे एक महाशय आज औरंगाबादमध्ये आले आहेत. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन ते नतमस्तक झाले. ज्या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांचे हाल केले. ज्याने सख्ख्या भावंडांची कत्तल केली. त्या माणसाचं उदात्तीकरण करून तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय.
https://twitter.com/mipravindarekar/status/1525019283260329990?s=20&t=gbB9h0IKgSiXXYw3av_Uew