नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या वासोळ येथील चिंतामण संपत मोरे यांनी आपल्या शेतात बाजरीचे पीक घेतले असून त्यात पाच फुटापेक्षा जास्त लांब कणीस आले आहे. मोरे यांनी राजस्थान येथून गावठी बियाणे असलेल्या वाणाची २००० रुपये किलो खरेदी केली. त्यानंतर त्यांनी २० गुंठ्यात त्याची लागवड केली. आता त्यांना त्यातून १० ते १५ क्विंटल बाजरीच उत्पादन मिळणार आहे. याच शेतात आता पाच फुटा पेक्षा मोठे कणीस आले आहे. या कणसाची शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी धाव घेत आहे. अनेक शेतक-यांनी मोरे यांच्याकडे दोन हजार रुपये प्रमाणे या बाजरीच्या बियाण्याची बुकींग सुध्दा केली आहे.
आता पर्यंत आपण साधारण अर्धा फुटा पर्यंतच भाजरीचं कणीस पाहिले असेल, मात्र तब्बल पाच फुटापेक्षा जास्त लांबच कणीस असलेली ही शेती चर्चेची ठरली आहे.