शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दूध दर प्रश्नी सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रित बैठक

by Gautam Sancheti
जून 12, 2023 | 9:02 am
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लम्पी आजारात राज्‍यातील सर्व पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्‍ट्र हे एकमेव राज्य आहे. दूध दरामध्‍ये निर्माण झालेल्‍या परिस्थितीवर मार्ग काढण्‍यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रिपणे बैठक घेण्यात येईल कोणत्‍याही परिस्थितीत दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.

शासन आपल्‍या दारी या उपक्रमांतर्गत महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी आज कनकुरी, नादुर्खी खुर्द आणि बुद्रूक या गावातील ग्रामस्‍थांशी संवाद साधून त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. शासन योजनांची माहिती देवून नागरिकांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांबाबत तातडीने उपाय योजना करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी अधिकाऱ्यांना दिल्‍या.

महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्‍हणाले की, दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्‍य सरकार गंभीर असून, दूध उत्‍पादक शेतकऱ्यांवर कोणताही अन्‍याय होणार नाही. राज्‍यात लम्पी संकट मोठ्या प्रमाणात आले असताना जनावरांचे मोफत लसीकरण करण्‍याचा निर्णय सरकारने घेतला. ज्‍यांची जनावरे दगावली त्‍यांनाही आर्थिक मदत राज्‍य सरकारने केली असल्‍याचे महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्‍यात जनतेच्‍या मनातील सरकार असल्‍याने सर्वच समाजातील घटकांच्‍या हिताचे निर्णय होत आहेत. शासन आपल्‍या दारी या उपक्रमातून शासनाच्‍या निर्णयांचा लाभ सामान्‍य माणसाला होत आहे की नाही याचाही आढावा घेतला जात असून, गावातील समस्‍या सुटण्‍यासाठीही हा उपक्रम महत्‍वपूर्ण ठरला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

शिर्डी आणि परिसरातील युवकांसाठी रोजगाराच्‍या संधी निर्माण करणे हाच आपला प्रयत्‍न असून, येत्या काळात शेती महामंडळाच्‍या जमीनींचा विनीयोग औद्योगिक कंपन्‍या उभारण्‍यासाठी करण्‍यात येणार असून, याबाबतचे नियोजन आता सुरु झाले असल्‍याचे महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Milk Rate Issue Cooperative Private Meet

You may like to read

  • अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे…बँक कर्ज फसवणूक प्रकरणाचा आरोप
  • बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने केली एकाला अटक…
  • नाशिकमध्ये विशाल रक्तदान अभियान…६००० शिबिर, एक लाख युनिट रक्त संकलित करण्याचा संकल्प
  • मराठा समाज विकासासाठी पुनर्गठित मंत्रीमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील
  • नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर…३१ प्रभाग १२२ नगरसेवक, हरकती मागवल्या
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोदावरी लाभक्षेत्रात १२ जूनपासून आवर्तन सोडण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

Next Post

पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांचे यशस्वी पुनर्लागवड; नितीन गडकरींनी केली पाहणी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
FyV0vX aQAAcnOv e1686541053982

पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांचे यशस्वी पुनर्लागवड; नितीन गडकरींनी केली पाहणी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011