नाशिक – देवळाली कॅम्प येथील आर्टीलरी सेंटरमध्ये नाेकरी लावून देण्याच्या अमिषाने अनेक तरुणांची लाखाे रुपये घेऊन फसवणूक करणारा ताेतया मेजरला अटक करण्यात आली आहे. पुणे येथील लष्करी गुप्तहेर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. देवळाली कॅम्प आर्टीलरी सेंटरच्या दक्षिण कमान गेटवर या तोतया मेजरला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्यावर रात्री उशिरा देवळाली कॅम्प पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश वाळू पवार (रा. हरसूल, ता. चांदवड, जि. नाशिक) असे अटकेतील ताेतया मेजरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील लष्कराच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती एजंट सक्रिय आहेत. आर्टिलरी सेंटरमध्ये वशिला नसतांनाही तरुणांची फसवणूक हाेत असल्याची माहिती मिलिटरी इंटेलिजन्सला लागली होती. एका मारुती इर्टिगा MH15 GX4888 मध्ये एक मेजर देवळाली कॅम्प परिसरात फिरत असून भरतीसाठी आलेल्या मुलांना भेटतो आणि त्यांचे कागदपत्रे जमा करून घेत आहे अशी माहिती समजताच इंटेलिजन्सने गाडीवर नजर ठेवली. तर, २८ डिसेंबर रोजी ही गाडी स्कूल ऑफ अर्टीलरी येथे आली आहे असे समजताच मिलिटरी हॉस्पिटल गेट नं १ वरील गार्डच्या मदतीने गाडी अडवून विचारपूस करण्यात आली. त्यात गणेश वाळू पवा मेजरचा ड्रेस घालून बसल्याचे आढळून आले. तसेच सोबत चालक निलेश छबू खैरे हा देखिल होता. त्यांची चौकशी केली असता गणेश पवार याने सैन्यदलात मेजर आहे, असा बनाव करुन अनेकांना लष्करात नौकरी लावून देतो असे अमिष दाखवून प्रत्येकाकडून तीन ते पंधरा लाख रुपये घेतल्याचे समाेर येत आहे.
स्टेशन मुख्यालय देवळाली कॅम्प आणि आर्टिलरी सेंटर येथे गट कमध्ये नोकरी लावून देण्याचे अमिष दाखऊन
दिगंबर मोहन सोनवणे यांची पाच लाख, राजाराम शिंदे चार लाख, नीलेश खेरे यांची तीन लाख, परशुराम आहेर, वैभव बाबाजी खैरे यांच्याकडून एकूण ३० ते ४० लाख,रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये मेजर रँक लावलेले फोटोग्राफ्स आणि स्टेशन हेडकॉटर देवळालीचा बनावट शिक्का वापरून बनवलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि सर्विस सर्टिफिकेट सापडले असून त्याने युनियन बँक ऑफ इंडिया चांदवड ब्रांचकडून लाखाे रुपयांचे कर्ज घेतले आहे असे निष्पन्न झाले आहे.