मुंबई – मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडण्याची कारवाई आज करण्यात आली. या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या या कारवाईचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्वीट मध्ये सोमय्या यांनी करुन दाखविले असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे यात आज नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याबाबत पर्यावरण खात्याकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात होता. उद्या सोमय्या हे दापोली जाणार असून ते येथे पाहणी करणार आहे. पण, या कारवाई नंतर नार्वेकर यांनी मी स्वत:हून बंगला पाडल्याचे म्हटले आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1429344157273788420?s=20