दिंडोरी – शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास आवाज व भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून मेरी भूकंप मापक केंद्रात ३.४ रिश्टर स्केलची नोंद झाली झाली आहे. नाशिकपासून १६ किमी वर भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी दिली. दरम्यान या भूकंप धक्क्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तालुक्यातील दिंडोरी शहर, मडकीजांब , हातनोरे, निळवंडी , जांबुटके, उमराळे (बु), तळेगाव ,वनारवाडी ,पाडे परिसरात रात्री ८.५८ वाजता भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यावेळी मोठा आवाज झाला. नागरिकांनी एकमेकांना फोन करत कुठे कुठे धक्के बसल्याची माहिती घेतली. याबाबत प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर तहसीलदार पंकज पवार यांनी माहिती घेत मेरी केंद्र तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभागास याबाबत कळविण्यात आले.मेरी केंद्राकडून सदर घटनेला दुजोरा मिळत ३.४ रिश्टर स्केलचे रात्री ९.५८ मिनिटांनी दोन धक्के बसल्याची नोंद झाली असून केंद्रबिंदू नाशिकपासून १६ किमी असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर यांनी दिली. नागरिकांनी घाबरून जावू नये मात्र काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
“Earthquake report“`
Date- 16/08/2022
Time- 20: 58: – :- (IST)
S-P : 2 Sec
Distance : 16 Km from Nashik Observatory
Duration- 280 Sec
Mg- 3.4