रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बाजारात लवकरच येणार बिनविषारी, सौम्य व दीर्घकाळ टिकणारे हँड सॅनिटायझर

जून 18, 2021 | 7:01 am
in राज्य
0
11AXPI

पुणे – पुणे-स्थित स्टार्ट-अपने चांदीच्या अतिसूक्ष्म कणांचा वापर करून हा अल्कोहोल विरहित, पाण्याचा समावेश असलेला, अ-ज्वलनशील आणि बिनविषारी हँड सॅनिटायझर विकसित केला आहे. हा सॅनिटायझर बिनविषारी, सौम्य आणि दीर्घकाळ टिकणारा अआहे. हातांसाठी सौम्य असणारा आणि हातांना कोरडे न करणारा पर्यावरण-स्नेही, दीर्घकाळ टिकणारा हा हँड सॅनिटायझर आता लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.
हँड सॅनिटायझरचा वारंवार वापर  केल्यामुळे कोविड-19 महामारीच्या काळात अनेक लोकांना हात कोरडे पडण्याच्या समस्येला सतत तोंड द्यावे लागले आहे.  ‘वुईइनोव्हेट-बायोसोल्युशन्स’ नामक या स्टार्ट-अप ने विकसित केलेला हँड सॅनिटायझर सूक्ष्मजीव विरोधी प्रक्रिया दीर्घकाळ सुरु ठेवतो. त्यामुळे तो पुनःपुन्हा लावण्याची गरज नसते. चांदीचे अतिसूक्ष्म कण संपर्कात येणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नायनाट करण्यासाठी हळूहळू आणि सातत्याने चांदीच्या आयनांचा स्त्रोत सोडतात. हा सॅनिटायझर सर्वसामान्य वातावरणात साठवून ठेवता येतो.
या सॅनिटायझरने केंद्रीय औषध प्रमाणक नियंत्रण संस्थेने सॅनिटायझरसाठी मंजूर केलेली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून उच्च प्रतीची विषाणूनाशक क्षमता दर्शविली आहे. ‘वुईइनोव्हेट-बायोसोल्युशन्स’ या संस्थेला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाकडून (NSTEDB)  ‘कवच 2020’ अनुदान मिळाले आहे आणि या संस्थेचे पुढील विकसन पुण्याच्या उद्योजकता विकास केंद्र (Venture Centre)  येथे झाले आहे. त्यांनी कोलॉईडल चांदीच्या द्रावणावर आधारित हँड सॅनिटायझर विकसित केला आहे. विषाणूमधील विशिष्ट RNA धाग्याचे संश्लेषण आणि विषाणूचे अंकुरण थांबविण्याच्या चांदीच्या सूक्ष्मकणांच्या क्षमतेचा वापर करून घेण्यावर हे तंत्रज्ञान आधारलेले आहे.
 “या सॅनिटायझरबाबतच्या अभ्यासाबद्दल आम्हाला पूर्ण खात्री असून आता आम्ही या  हँड सॅनिटायझरच्या विशिष्ट औषधी सूत्राला  भारताच्या केंद्रीय औषध प्रमाणक नियंत्रण संस्थेकडून परवाना दिला जाण्याची वाट पाहत आहोत. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण संशोधन भारताला त्याच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या दिशेने वेगाने प्रगती करण्यास मदत करेल आणि भविष्यात अशा महामारीला तोंड देण्यासाठी देशाला स्वत्व टिकवून ठेवण्यासाठी सक्षम करेल,” असे या संस्थेच्या सह-संस्थापक आणि मुख्य परिचालन अधिकारी डॉ.अनुपमा इंजिनियर यांनी सांगितले.
चांदीचे अतिसूक्ष्म कण अत्यंत परिणामकारक विषाणूरोधक असल्याचे सिध्द झले आहे त्यामुळे हे कण एचआयव्ही, कावीळ, नागीण, फ्ल्यू आणि इतर अनेक प्राणघातक विषाणूंच्या विरोधात उपयुक्त ठरतात. नुकत्याच हाती आलेल्या अहवालातून असे सुचविण्यात आले आहे की, चांदीच्या अतिसूक्ष्म कणांतील काही घटक कोरोना विषाणूमधील विशिष्ट RNA धाग्याचे संश्लेषण आणि विषाणूचे अंकुरण थांबविण्यात यशस्वी ठरतात. ज्या गुणधर्मावर ‘वुईइनोव्हेटबायोसोल्युशन्स’ या संस्थेच्या हँड सॅनिटायझरचे तंत्रज्ञान आधारित आहे ती कोलॉईडल चांदी कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावरील ग्लायकोप्रोटिन्सना अवरोध निर्माण करून विषाणूची वाढ आणि संसर्गक्षमता यांना प्रतिबंध करते आणि ज्यामुळे कोविड-19 संसर्गाच्या प्रसाराला अटकाव करता येतो.
या हँड सॅनिटायझरची विविध प्रकारच्या विषाणूंविरोधातील कार्यक्षमता तपासण्यासाठीचा अभ्यास सध्या सुरु आहे.
10PGXD
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लॉकडाऊनमुळे वाहनधारकांना मोठा दिलासा; रस्ते वाहतूक मंत्रालयाने काढला हा आदेश

Next Post

कारकीर्द मध्येच सोडावी लागलेल्या महिला वैज्ञानिकांच्या पुनरागमनाचा प्रवास उलगडणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
image001Q53F

कारकीर्द मध्येच सोडावी लागलेल्या महिला वैज्ञानिकांच्या पुनरागमनाचा प्रवास उलगडणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011