सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

औद्योगिक विकासासाठी राज्य सरकारने आणली सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

by India Darpan
जुलै 15, 2023 | 9:56 pm
in राष्ट्रीय
0
F1FJmVnaAAAdg0c

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध असून, राज्‍य औद्योगिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील हॉटेल ताज गेट वे मध्ये आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 अनावरणप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, उद्योग क्षेत्रात पुरूषांसोबतच महिला उद्योजकांचा सहभाग वाढतांना दिसत आहे. महिला उद्योजकही औद्योगिक क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. राज्यात उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सवलती जाहीर केल्यामुळे उद्योगक्षेत्राची भरभराट होताना दिसत आहे. नाशिकला उद्योगवाढीस भरपूर वाव असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी भविष्यात निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी इन्फ्रास्टक्चर महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासन उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेश विकासासाठी पूर्णपणे सकारात्मक असून राज्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या काही सूचना असल्यास त्‍या आपण शासनाकडे पाठवाव्यात. या सूचनांची शासनस्तरावर दखल घेण्यात येईल. उद्योजकांना पूर्णपणे संरक्षित केले पाहिजे ही शासनाची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी योवळी सांगितले.

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक : उपमुख्यमंत्री अजित पवार
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. त्याअनुषंगाने आपल्या राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले. कोणत्याही राज्याची आर्थिक परिस्थिती ही त्या राज्यातील औद्योगिक विकास व रोजगार यावर अवलंबून असते. जे उद्योग उभे राहणार आहेत त्यांना शिथिलता देवून आवश्यक अनुषंगिक परवानग्या दिल्यात तर नक्कीच ते भरभराटीला येतील यात शंका नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत प्रास्तविकात म्हणाले, चौदा वर्षांनंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 आज उद्योजकांना समर्पित करण्यात येत आहे. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर राहील इतकी ताकद या सर्वसमावेशक नियमावलीत आहे. सर्व क्षेत्रातील उद्योजकांच्या समन्वयाने ही नियमावली तयार करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योजकांची कार्यशाळा येथे घेण्यात आली. कार्यशाळेत सर्व स्तरातील उद्योजकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रास्तविकात दिली.

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी मनोगतात नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबाबत माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन सोनाली मुळे यांनी केले.

MIDC ची सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली कार्यशाळा | नाशिक https://t.co/iZYQKQ6Rmm

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 15, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज यांना होईल जवळच्या व्यक्तींपासून त्रास; जाणून घ्या, रविवार, १६ जुलै २०२३चे राशिभविष्य

Next Post

सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांना प्रतिष्ठीत डॉ. सी. डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार प्रदान

Next Post
DSC 3824 01 1 e1689438729361

सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांना प्रतिष्ठीत डॉ. सी. डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

cbi

मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहभागी असलेल्या या सदस्याला सीबीआयने केली अटक

जून 9, 2025
Untitled 16

मुंबईसह या १८ ठिकाणी ईडीने टाकले छापे….७ लाख जप्त, २२ बँक खाते गोठवले

जून 9, 2025
dhanushayban

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी…

जून 9, 2025
Untitled 23

ठाकरे गटाला मोठा धक्का…डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 9, 2025
bharat gaurav tourist train 1024x683 1

छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ रवाना…या ठिकाणी देणार भेटी

जून 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आलेल्या संधी सोडू नये, जाणून घ्या, सोमवार, ६ जूनचे राशिभविष्य

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011