शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एमआयडीसी मधील अपघातात मयत व्यक्तींच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची मदत तर जखमी कामगारांना ३० लाख रुपये व मोफत उपचार

by India Darpan
एप्रिल 12, 2025 | 8:11 pm
in संमिश्र वार्ता
0
उमेरड एमआयडीसी मधील अपघात 2 1024x576 1

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी भिषण स्फोटात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची तर जखमी झालेल्या कामगारास ३० लाख रुपयांची मदत केली जात असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. या दुर्देवी अपघातात मृत व जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारासोबत शासन खंबीरपणाने उभे आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत असून जे जखमी आहेत त्यांच्यावर शासनातर्फे मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उमरेड येथील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भिषण स्फोट होऊन तीन कामगार जागीच मृत्यू पावले. तर आठ कामगार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. यातील २ कामगारांचा उपचार सुरु असतांना मृत्यु झाला.

घटनेची माहिती कळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निर्देश देवून जखमींवर उपचारांबाबत व आवश्यक ती मदत देण्यास सांगितले होते.

आज दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीने उमरेड येथील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. कामगारांच्या जिवावर बेतणारे अपघात यापुढे होऊ नये यासाठी औद्योगिक सुरक्षिततेच्यादृष्टीने जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. घटनास्थळाची पाहणी करताना त्यांच्या समवेत खासदार श्याम बर्वे, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, राजेंद्र मुळक, कंपनीचे प्रमुख अरुण भंडारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अपघातात मृत कामगारांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे ५५ लाख तर शासनातर्फे ५ लाख अशी आर्थिक मदत दिली जाईल. याचबरोबर जखमी कामगारांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये आर्थिक मदत व शासनातर्फे मोफत उपचार करण्यात येत आहेत. याच बरोबर मृत्यू व जखमी झालेल्या परिवारातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी दिली जाणार आहे.

अपघातात मृत पावलेले कामगारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पियुष दुर्गे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, सचिन पुरुषोत्तम मसराम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, निखिल शेंडे – रा. विरखंडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, अभिलाष जंजाळ – रा.गावसूत, ता.उमरेड, व निखिल नेहारे – रा. चिखलढोकडा, ता. उमरेड, जि.नागपूर

अपघातात जखमीमध्ये मनीष वाघ – रा.पेंढराबोडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, करण शेंडे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, नवनीत कुमरे – रा.मांगली, ता.उमरेड, जि.नागपूर, पियुष टेकाम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, करण बावणे – रा.पिंपळा, ता.उमरेड, जि.नागपूर, कमलेश ठाकरे – रा.गोंडबोरी, ता.भिवापूर, जि.नागपूर.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात वावरणा-या दोघा तडिपारांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, रविवार, १३ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, रविवार, १३ एप्रिलचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

Untitled 63

वारसदार म्हणवणारे आज सत्तेसाठी लाचार…एकनाथ शिंदे

जून 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011