बुधवार, ऑगस्ट 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बाळाला मिळाले नवजीवन…या हॅास्पिटलमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर मिनिमली इनवेसिव्ह कार्डियाक सर्जरी

by Gautam Sancheti
सप्टेंबर 21, 2024 | 6:01 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240921 WA0116 1 e1726921846812

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे दोन वर्षांच्या मुलीवर MICS (मिनिमली इनवेसिव्ह कार्डियाक सर्जरी) पद्धतीचा अवलंब करून ह्रदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. पहिल्यांदाच एवढ्या लहान बाळावर या पद्धतीने ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून, हे हॉस्पिटलच्या वैद्यकीय कौशल्याचे आणि प्रगतीचे मोठे उदाहरण ठरले आहे.

बाल हृदय विकार तज्ञ डॉ संतोष वाडीले यांच्या कडे एक दांपत्य त्यांच्या दोन वर्षीय मुलीचे वजन गेल्या सहा महिन्यापासून वाढत नाही अशी तक्रार घेऊन आले. काही चाचणी परीक्षण आणि निदान केल्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागेल असे सुचवण्यात आले. कु. जागृती वय २ वर्षे, ( नाव बदललेले आहे ) हिला जन्मजात ह्रदयच्या एका कप्प्याला 20mm एवढ्या मोठ्या आकाराचे छिद्र होते. परंतु मुलीचे वय पाहता भविष्यात तिला अडचणीला सामोरे जावे लागू नये हे नातेवाईकांना समजावून सांगितल्यानंतर हृदयाची “ओपन-हार्ट” ला पर्यायी “किहोल (MICS) ” शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले. जेमतेम पाच सेंटिमीटरचा छातीजवळ छेद घेऊन हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा नवीन प्रयोग अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

या यशावर डॉ. सुशील पारख म्हणाले कि, आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये स्वतंत्र लहान मुलांचा हृदय विकार विभाग असून या विभागामध्ये हृदय विकार तज्ञ , हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ , लहान मुलांचे अतिदक्षता विभागातील तज्ञ , चौवीस तास उपलब्ध आहेत. तसेच याच तज्ज्ञांच्या देखरेखीखाली लहान मुलांचे हृदयाचे आजार , निदान व उपचार , लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. लहान बाळांची काळजी घेणारे प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीने अशा अत्याधुनिक तंत्राचा अवलंबकरून अनेक गुंतागुंतीच्या यशस्वी केसेस हाताळण्यात आम्हला यश प्राप्त झाले आहे. ही शस्त्रक्रिया अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्ससाठी एक मैलाचा दगड आहे. अशा आव्हानांचा सामना करणाऱ्या अनेक कुटुंबांना ह्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नवी आशा मिळाली आहे. आम्ही या कुटुंबाला त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.

ही शस्त्रक्रिया बाल हृदय विकार तज्ञ डॉ संतोष वाडीले , लहान मुलांचे हृदय शल्य चिकित्सक डॉ प्रणव माळी आणि भूलतज्ज्ञ डॉ संदीप भंगाळे , यांच्या सहकार्याने यशस्वी रित्या पार पाडली. एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व निदानात्मक सुविधांची उपलब्धता, या सर्व सुविधांमुळे हे यश मिळेल आहे. असे प्रतिपादन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी केले.

जन्मजात बाल हृदय रोगाची सामान्य लक्षणे :
वारंवार निमोनिया होणे, वजन हळूहळू वाढणे , खूप घाम येणे , चक्कर येणे , लवकर थकवा येणे , छातीत धडधड होणे , बाळ निळे पडणे , बाळाला वरील लक्षण असल्यास तातडीने २डी इको ची टेस्ट करून हृदय विकार तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावा असे आव्हान डॉ संतोष वाडीले यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी….ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची मागणी

Next Post

७५ हजाराची लाचेची मागणी करणा-या माजी सरपंचा विरुध्द गुन्हा दाखल…एसीबीची कारवाई

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
acb

७५ हजाराची लाचेची मागणी करणा-या माजी सरपंचा विरुध्द गुन्हा दाखल…एसीबीची कारवाई

ताज्या बातम्या

IMG 20250806 WA0046 1

ताराचंद म्हस्के पाटील पुन्हा अजित पवार गटात दाखल

ऑगस्ट 6, 2025
upsc

यूपीएससीच्या भर्ती परीक्षांसाठीचे अलर्ट संदेश आता संस्थांना ईमेलद्वारे उपलब्ध होणार

ऑगस्ट 6, 2025
fir111

रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी १९ वर्षीय परप्रांतीय प्रवाशास लुटले…गुन्हा दाखल

ऑगस्ट 6, 2025
crime 1111

वाहनचोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला

ऑगस्ट 6, 2025
Untitled 62

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाला नवे वळण….ते हॅाटेल २८ वेळा बुक करण्यात आल्याचा या संस्थेने केला दावा

ऑगस्ट 6, 2025
4 1024x773 1

राज्य मराठी चित्रपट पारितोषिक सोहळा उत्साहात संपन्न…या कलाकारांचा झाला सन्मान

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011