नवी दिल्ली – वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवता ठेवता प्रत्येकाच्या नाकीनऊ येतात. पण मायक्रोसॉफ्टचा नवा पासवर्डरहित साइन इन पर्याय सर्वांनाच आनंदीत करणारा ठरणार आहे. युजर्सना पासवर्डचा वापर केल्याविनाच साइन इन करण्याची सुविधा देण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने केली आहे. म्हणजेच, युजर्स आता Outlook अकाउंट आणि वनड्राईव्हमध्ये साइन इन करू शकणार आहेत.
एंटरप्राइज अकाउंटमधून पासवर्ड कायमस्वरूपी हटविण्याची कंपनीची योजना आहे. पासवर्डरहित साइन इन पर्याय फक्त व्यावसायिक युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आला होता. टेकक्रंचच्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट पासवर्ड आधारित साइन इनची प्रक्रिया बंद करणार आहे. त्याऐवजी युजर्सना मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर अॅप (Microsoft Authenticator App), विंडो हॅलो (Windows Hello) चा वापर करावा लागणार आहे.
पासवर्डरहित म्हणजे, आपला पासवर्ड हटविणे आणि त्याच्याऐवजी साइन इन करण्यासाठी पासवर्डरहित पद्धतीचा वापर करणे होय. मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर अॅप, विंडोज हॅलो, एसएमएस किंवा ईमेल कोड आणि फिजिकल सिक्योरिटी Keys अधिक सुरक्षित आणि सुविधाजनक साइन इन पद्धत प्रदान करते.
स्मार्टफोनवर https://aka.ms/Authapp जावे, किंवा मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर अॅपला डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवर जावे. अकाउंट उघल्यानंतर सूचना आणि सिग्नलचे पालन करावे. मायक्रोसॉफ्ट अकाउंट अॅडिशनल सेक्युरिटी पर्यायात साइन इन करण्यासाठी क्रेडेंशिअल नोंदवा आणि पासवर्ड फ्री अकाउंटअंतर्गत टर्न ऑन पर्याय निवडावा. आपले अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी संकेतांचे पालन करावे. मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर अॅपला पाठविलेल्या रिक्वेस्टला स्वीकारा.