मुंबई – मायक्रोमॅक्सचा नवीन स्मार्टफोन IN 2B आज (६ ऑगस्ट) पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर या फोनची विक्री दुपारी १२ वाजेपासून सुरू झाली आहे. तसेच ग्राहकांना यामध्ये खरेदीवर आकर्षक सूट देण्यात येत आहे. फीचर्सबद्दल बोलायचे तर, मायक्रोमॅक्स इन 2 बी मध्ये एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
वैशिष्ट्ये
मायक्रोमॅक्स इन 2 बी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 6.52-इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720 बाय 1600 पिक्सेल, आस्पेक्ट रेशियो 20: 9 आणि स्क्रीन टू बॉडी रेशियो 89 टक्के आहे. याशिवाय मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनचे अंतर्गत स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते.
कॅमेरा
आकर्षक फोटो क्लिक करण्यासाठी कंपनीने मायक्रोमॅक्स इन 2 बी स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर 13MP आहे. तर 2MP लेन्स दुय्यम सेन्सर म्हणून देण्यात आला आहे. यासह, फोनच्या पुढील भागात व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल.
बॅटरी
मायक्रोमॅक्सने मायक्रोमॅक्स इन 2 बी मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगने सुसज्ज आहे. या व्यतिरिक्त, स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, हेडफोन जॅक, ब्लूटूथ, जीपीएस व यूएसबी टाइप-सी पोर्ट आदी कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध असतील.
किंमत
मायक्रोमॅक्स इन 2 बी स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. तर त्याचे अपग्रेडेड मॉडेल 6GB रॅम प्लस 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. त्याचबरोबर हे उपकरण ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.
ऑफर
एक्सिस आणि आयसीआयसीआय बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड धारकांना मायक्रोमॅक्स इन 2 बी खरेदीवर 10 टक्के सूट देईल. अॅक्सिस बँकेच्या डेबिट कार्डधारकांना 10 टक्के सूट मिळणार आहे. तसेच 3000 रुपयांची विशेष सवलत दिली जाईल. याशिवाय हा स्मार्टफोन 8,450 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह खरेदी केला जाऊ शकतो.