नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झुमका वाली पोरं… या गाण्याच्या यशानंतर एसकेएस म्युझिक आणि समीर केएस प्रेजेंटस पुन्हा एक आगळ्या वेगळ्या बॉलिवूड स्टाईल मधील ” मी तुना साजन”. या खान्देशी गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याला दोनच दिवसात प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या गाण्यातील अभिनेता अली खाटीक आणि सुप्रसिध्द मॉडेल, गायिका, अभिनेत्री संज्योती देवरे यांच्या सुंदर अदाकारीने गाण्याची रंगत वाढलेली आहे.
हे खान्देशी गाणे पाहताना बॉलिवूडच्या गाण्याचा फिल येतो. या गाण्याचे गीतकार, संगीतकार, गायक समीर के.एस. आणि गायिका श्रेयशी राव यांच्या आवाजात आहे. या गाण्याचे चित्रीकरण रूपेश पाईकराव यांनी केले आहे. संज्योतीच्या सौंदर्याची नॄत्याची अदाकारी आणि अली खाटीकचा अभिनय व डान्स बरोबरच गाण्याच्या तालावर रसिकांचे पाय ही नक्की च थिरकतील अस खान्देशी गाणं रसिकांच्या भेटीस आले असून सर्वांनी नक्की पाहावे असे आवाहन एसकेएस म्युझिक आणि समीर केएस प्रेजेंटसच्या कलाकारांनी केले आहे.