विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी एमएचटी सीईटी या परीक्षेच्या वेळापत्रकात कडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. सध्या कोरोना आणि लॉकडाऊन मुळे सर्वच परीक्षांची स्थिती दोलायमान आणि अनिश्चित असताना एमएसटी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
अर्जाची मुदत
महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल (एमएचटी सीईटी २०२१) परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ८ जून पासून सुरू झाली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना सांगितले की, या परिक्षेकरिता अर्ज ७ जुलैपर्यंत mhtcet2021.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतील.
नोंदणी प्रक्रिया
महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्टसाठी नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत अधिकृत संकेतस्थळ, mhtcet2021.mahacet.org वर भेट दयावी,
– त्यानंतर मुख्यपृष्ठावरील “एमएचटी सीईटी २०२१ नोंदणी” या लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आवश्यक तपशील भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
– त्यानंतर एमएचटी सीईटी २०२१ अर्ज भरण्यासाठी अर्ज क्रमांक आणि संकेत शब्द प्रविष्ट करा.
– आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज फी भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
– यानंतर, उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी एमएचटी सीईटी २०२१ च्या अर्जाचा प्रिंट आउट घ्यावा.
हे लक्षात ठेवा
विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की एमएचटी सीईटी २०२१ परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी त्यांनी त्यांचा सक्रिय ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर वापरावा. या परीक्षेशी संबंधित तपशील केवळ ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर पाठविला जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की, महाराष्ट्र व बाहेरील राज्यांतील सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी ८०० रुपये आहे. त्याचवेळी, परीक्षेशी संबंधित कोणत्याही नवीन माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.