मुंबई – महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण (म्हाडा) ने गेल्या महिन्यातील भरती परीक्षेचा पेपर अचानक रद्द केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पेपर फुटीच्या संशयावरुन हा पेपर रद्द करण्याच आला. मात्र, यानंतर आता म्हाडाने त्यांच्या भरती परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे चित्र होते. प्रत्यक्षात यात एक गोंधळ झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे म्हाडा आणि एमपीएससीच्यावतीने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतली जाणारी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. या दोन्ही परीक्षा २९ जानेवारी २०२२ रोजी पूर्वनियोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छुक विद्यार्थी पुन्हा कात्रीत सापडले आहेत. म्हाडाने या परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी होत आहे. कारण, विद्यार्थ्यांना एका दिवशी एकच पेपर देणे शक्य होणार आहे. आता यासंदर्भात म्हाडाच्यावतीने काय निर्णय होतो, याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/RaviFatke/status/1476927310347399171?s=20