मुंबई – कोकणातील महाड तालुक्यातील तळीये गाव दरड कोसळल्यामुळे उद्धवस्त झाले आहे. येथील गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात म्हाडाने पुढाकार घेतला आहे. तळीये ग्रामस्थांना म्हाडाच्यावतीने घरे बांधून देण्यात येतील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आव्हान यांना सूचना केली होती. त्यानुसार म्हाडाची घरे कशी असतील त्याची प्रतिकृतीही आव्हाड यांनी सादर केली आहेत. ही सुरुवात आहे. पावसाचा जोर ओसरताच घरांच्या बांधणीला प्रारंभ केला जाईल आणि ग्रामस्थांना हक्काचे घर मिळेल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
आव्हाड यांनी सादर केलेली म्हाडाची संभाव्य घरे अशी