मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डिसेंबर २०१९ मध्ये पहिली कार लॉंच केल्यापासून परिसंस्था निर्माण करण्यासोबत ग्राहकांना सोईस्कर चार्जिंग पायाभूत सुविधा देण्याप्रती असलेले मिशन सुरू ठेवत एमजी मोटर इंडियाने आज नवीन उद्यम ‘एमजी चार्ज’च्या लॉंचची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत एमजी भारतभराततील निवासी ठिकाणी १००० एसी फास्ट चार्जर्स इन्स्टॉल करेल आणि असे करणारा भारतातील ओईएमचा हा पहिलाच उपक्रम आहे.
स्मार्ट चार्जर्स टाइप २ चार्जर्स असतील, जे आघाडीच्या विद्यमान व भावी ईव्हींना साह्य करतील. तसेच हे चार्जर्स सिम-सक्षम असतील आणि त्यांना शेअरेबल चार्जर मॅनेजमेंट सिस्टिमच्या माध्यमातून पाठिंबा असेल. कनेक्टेड एसी चार्जिंग स्टेशन्स या सोसायटींमधील निवासी व अभ्यागतांच्या ईव्ही चार्जिंग गरजांची २४*७ तास काम करत पूर्तता करतील. यामुळे सोसायटींना भविष्यासाठी सुसज्ज, हरित बनवण्यास मदत होईल आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याप्रती प्रोत्साहन मिळेल. हे उत्सर्जन कमी करत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी योगदान देण्याप्रती एक जागरूक पाऊल देखील आहे. एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “एमजी भारतातील ईव्ही परिसंस्था वाढवण्याच्या आपल्या मिशनच्या दिशेने सतत काम करत आहे. एमजी चार्जच्या लॉंचसह आम्ही सोयीसुविधांमध्ये वाढ करणार आहोत आणि ग्राहकांच्या चार्जिंगसंदर्भातील समस्यांचे निराकरण करणार आहोत. तसेच आम्ही ईव्ही जीवनशैली अवलंबण्यास अधिकाधिक ग्राहकांना प्रोत्साहित करत आहोत. या उपक्रमासह आता ग्राहकांना आमचे ६-मार्गी चार्जिंग सोल्यूशन मिळेल आणि त्यांना अधिक साह्य व विश्वास देण्यात येईल.”
एमजी हा उपक्रम राबवण्यासाठी इलेक्ट्रीफाय (एमजी डेव्हलपर प्रोग्राम व ग्राण्ट २० विजेता), एक्झिकॉम, ईचार्जबेज, रेसिडण्ट वेल्फेअर असोसिएशन्स आणि इतर नवीन भागीदारांसोबत सहयोग करेल. आपले भागीदार आणि इतर आरडब्ल्यूएसोबत एमजी भविष्यात कम्युनिटी चार्जर पायाभूत सुविधांना चालना देणे सुरूच ठेवेल. असे करत कार उत्पादक कंपनीचा ईव्ही अवलंबतेला चालना देण्याकरिता विविध निवासी ठिकाणी एकसंधी व सोईस्कर वेईकल चार्जिंग अनुभव देण्याचा मनसुबा आहे. एमजी आरडब्ल्यूएसोबत सहयोग करेल आणि इन्स्टॉलेशन प्रक्रियेसाठी एण्ड-टू-एण्ड मार्गदर्शन, समन्वयन व पाठिंबा देण्यासोबत निवडक निवासी सोसायटींसाठी खर्चांमध्ये बचत करण्याची सुविधा देईल. एमजी हरित गतीशीलतेप्रती जागरूक पाऊल उचलत आहे आणि भारतातील ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा प्रबळ करत आहे. कंपनीने सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन्स सादर करण्यासाठी नुकतेच फोर्टम व टाटा पॉवरसोबत सहयोग केला आहे. याव्यतिरिक्त एमजी झेडएस ईव्ही मोफत एसी फास्ट-चार्जर (ग्राहकाच्या घरी/ कार्यालयामध्ये इन्स्टॉल करता येते), प्लग-अॅण्ड–चार्ज केबल ऑनबोर्ड आणि चार्ज-ऑन-दि-गो सह आरएसए (रोडसाइड असिस्ट) सोबत येते.